धक्कादायक: बीडच्या गटशिक्षणाधिकार्याने चक्क मृत कर्मचार्यावर सोपवली जबाबदारी?
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

बीड : बीड जिल्हा प्रशासनामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही एकीकडे परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले असताना दुसरीकडे बीडचे गटशिक्षणाधिकारी हे त्यांच्या दिवाळखोरीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
राज्यभरात शुक्रवार पासून दहावी बोर्ड परिक्षांना सुरुवात झज्ञली आहे. या परीक्षेमध्ये कॉफी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतिने कडक पावले उचलत उपाय योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या वेळी चौसाळा येथील एका महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या महाविद्यालयावर नेमनूकीस असलेल्या 16 शिक्षकांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान बीड तालुक्यातील कुर्ला येथे आज चक्क परीक्षार्थींसाठी शाळेच्या इमारतीवर मंडप टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारात आता पुन्हा एका गंभीर प्रकरणाची भर पडली आहे. बीड गटशिणिाधिकारी कार्यालयाचा एक नावाच कारभार समोर आला आहे . दहावीच्या परीक्षेमध्ये होणार्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून बैठे पथक आणि भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी त्याच्या अधिपत्याखाली बीड पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक व इतर कर्मचार्यांच्या नावाने बैठे पथक आणि भरारी पथक नियुक्त केले आहे. यामध्ये सन 2011 साली आजारपणामुळे मृत्यूमुखी पडलेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांचे देखील नाव आल्याने आणि त्याच्या नावाने ऑर्डर इश्यू झाल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मयत ए.टी. आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी दिली गेले असून जेवढ्या कर्मचार्यांच्या नावाने हे आदेश पारित झाले आहेत त्याच पाच वर्षापूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवक आगलावे यांचे नाव आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी नशा पाणी करुन या ऑर्डर काढल्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एखादाा शासकीय कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या नावाने प्रशासकीय कामकाजाची ऑर्डर काढण्याचा हा प्रकार म्हणजे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या ऑर्डरमुळे आता आगलावे कुटुंबाला जो मनस्ताप झाला आहे त्याची भरपाई कोण करणार अशी चर्चा असून समंदर खान हे स्वत: अरविंद आगलावे यांना स्वर्गात जाऊन ऑर्डर इश्यू करणार का? असा देखील प्रश्न चवीने चर्चीला जात आहे. गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्यावर कार्यालयीन कामकाजात निष्काळजीपणा केल्याच्या दोषारोपाखाली कारवाईची मागणी शिक्षणप्रेमींतून होत आहे.



Comments