top of page

बीडमध्ये आभाळ फाटलं....

सिंदफणा, गोदावरीला महापूर, बिंदूसराने पातळी ओलांडली आष्टीच्या कड्यामध्ये हेलिकॉप्टरने नगारिकांचे रेस्क्यू. किन्हा नदीत एक जण वाहून गेला. हजारो हेक्टर शेतीपीके पाण्याखाली.

ree

बीड, जालना, धाराशिव: मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार, ढगफूटी सदृष्य पाऊस कोसळल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.बीड जिल्ह्यातील सिंदफणा, मांजरा, बिंदूसरा नद्यांसह गोदावरी नदीला महापूर आल्याने हाजारो हेक्टरातील शेतीपीके पाण्याखाली गेली. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथे महापूर आल्याने सहा गावांचा संपर्क तुटला.

जवळपास 48 नागरिक पुराच्या पाण्यात आडकल्याने आमदार सुरेश धस यांनी तात्काळ वरिष्ठ प्रशासनाशी संपर्क करून एनडीआरएफ च्या टिमला पाचारण केले त्यानंतर हेलिकॉप्टरच्या पूराच्या पाण्यात आडकलेल्या नागरिकांची सुटका केली. आंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथील नदीला महापूर आल्याने शहरात पूराचे पाणी शिरले.


बीड शहरातील मोमीनपूरा भागात बिंदूसरा नदीच्या पूराचे पाणी शिरल्याने नागरिकांना संसापयोगी साहित्यासह घर सोडून जीव वाचवण्यासाठी स्थालांतर करावे लागले. शिरुर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील एक वृद्ध ईसम तलावाच्या काठावर मासे पकडत असताना पूराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. जायकवाडी प्रकल्पाचे 27 दारे खुली करण्यात आल्याने गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.


नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हजारो हेक्टरावरील शेतीपीके पाण्याखाली गेली आहेत.


कडा शहरात पूराचे पाणी शिरल्याने जीवित हानी झाली नसली तरी कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. शिरुर शहरात बाजारतळाला सिंदफणा नदीच्या पूराचा वेढा पडल्याने व्यवसायीकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.


मध्यरात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आल्याची माहिती मिळताच भाजप आमदार सुरेश धस यांनी भल्या पहाटेपासून प्रशासनाशी संपर्क साधला. कडाशहरासह परिसरातील सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून जवळपास 48 नागरिक पूराच्या पाण्यात आडकल्याची माहिती मिळताच सकाळपासूनच सुरेश धस घटनास्थळी दाखल झाले.


पुरस्थितीचा आढावा घेत त्यांनी स्वत: नागरिकांसमवेत बचावकार्यात सहभाग घेतला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी घराच्या छताचा अश्रय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येताच आमदार धस यांनी प्रशासनाकडे एनडीआरएफ टीमसह हेलिकॉप्टरची मागणी केली. पूरस्थळापासून काही अंतरावर तातडीने हेलीपॅड बनवण्यात आले. एनडीआरएफ च्या टीमसह हेलिकॉप्टर दाखल होताच दुपार पर्यंत बचावकार्याची यशस्वी मोहिम राबवून पूरात आडकलेल्या सर्व नागरिकांची सूटका करण्यात आली. बचवलेल्या नागरिकांनी आनंदाश्रूने आमदार धस यांचे आभार मानले.

Comments


bottom of page