भिगवण कथित अपहरण प्रकरणात मुलीच्या आईचे आमदार राहुल कुल यांच्यावर आरोपकुल यांनी आरोपांना दिलं उत्तर, नि:ष्पक्ष चौकशीची केली मागणी
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

भिगवण : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव आल्यानं खळबळ उडाली आहे. ज्या मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं गेले त्या मुलीच्या आईनं राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप राहुल कुल यांनी फेटाळून लावले असून या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी निष्पक्षपणे करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ज्या महिलेनं राहुल कुल यांच्यावर आरोप केले आहेत, तिनं आधी आपल्या मुलीचं गावातीलच एका मुलानं अपहरण केल्याचा आरोप केला होता. पण संबंधित मुलीच्या ताज्या जबाबानुसार तिचं अपहरण झालं नसून ती स्वत:चं त्या मुलासोबत निघून गेली होती. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला आहे. त्यामुळं याप्रकरणाला आर्ई आणि तिच्या भावाच्या आरोपाव्यतिरिक्त वेगळं वळण मिळालं आहे.
आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप : आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेणारा मुलगा हा दौंडचे आमदार राहुल कुल यांचा कार्यकर्ता असून त्यानं आपल्या अपहरणाच्या दिवशीच व्हॉट्अॅप स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो ठेवत ठामपणे उभा असं कॅप्शन त्याला दिलं होतं. त्यामुळऐ या प्रकारणाला राहुल कुल यांचा पाठिंबा असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. तसंच इतकं प्रकरण तापलेलं असताना राहुल कुल मला भेटायला का आले नाहीत? मी त्यांच्याच दौंड तालुक्यातील रहिवासी आहे, असा सवालही या मुलीच्या आईने केला आहे.
आमदार राहुल कुल यांचे आरोपांना प्रत्यूत्तर: मुलीच्या आईच्या आणि ग्रामस्थांच्या आरोप फेटाळून लावत राहुल कुल म्हणाले की, मलाही मुलगी असून माझ्या घरातून महिला पदाकिधारी राहिल्याव आहेत. त्यामुळं मुलीसंदर्भातील प्रश्न कशा पद्धतीनं हाताळायचे यांची मला जाणीव आहे. या विषयात मी पीडीत मुलीच्या बाजुनं अतिशय भक्कम भूमिका धेतल्यामुळं जाणीपूर्वक माझी बदनामी केली जात असल्याचं माझं प्राथमिक मत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी माझी भूमिका नि:पक्षपाती असून त्यामुळं काही लोक दुखावले गेले आहेत. म्हणूनच त्यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा. ज्यावेळेस गुन्हा घडला, त्यावेळी मी मुलीच्या नातेवाईकांच्या संपर्कात होतो. मुलीचा शोध घेईपर्यंत मी पोलिस प्रशासनाच्या संपर्कात होतो. असंही राहूल कुल म्हणाले.



Comments