top of page

मंत्रालयातील लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्विकारताना अटक; मंत्रालयातील घटनेने खळबळ

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 'एसीबी'ने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली असून राजेंद्र ढेरंगे असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी 50 हजारांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही अटक करण्यात आली आहे. मंत्रालयातील दुसऱ्या  मजल्यावर  ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

 सबंधित कामाची तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवळ यांचं संपूर्ण कार्यालय ताब्यात घेतलं गेलं. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात  मंत्रालयात खुलेआम  लाचखोरी  आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात अक्षरशः बेबंदशाही सुरू असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments


bottom of page