मतदारसंघात मोठ-मोठे बॅनर, समाजिक शांतता भंगचा आरोप!
- Navnath Yewale
- Aug 25, 2025
- 2 min read
पुतळा जाळला, प्रिपेड श्वान अन् दगडफेक...
बीडच्या गेवाराईमध्ये तुफान राडा; हाकेच्या गाडीवर दगडफेक

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी मतदारसंघात बॅनर लावल्याने सामाजीक तेड निर्माण होत असल्याचा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार पंडित यांच्यावर आरोप केले. लक्ष्मण हाके यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देत गेवराई येथे आमदार पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच हाके यांनी गेवराईत येण्याचे चॅलेंज देत आमदार पंडितांना डिवचले. आज हाके गेवराई दौर्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या गाडीवर आमदार पंडीत यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी हाके यांनी जमावकडे पाहत दंड थोपटत वज्रमुठ आवळली. दरम्यान हाके यांच्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना आमदार विजयसिंह पंडीत यांनी ‘प्रिपेड श्वान’ म्हणत हाके हा रिचार्ज होईल तेवढाच भुंकतो असा हल्ला बोल केला.
गेवराई विधानसभा मतदार संघात आमदार विजयसिंह पंडीत यांचे मनोज जरांगे यांच्या आदोलनासमर्थनार्थ मोठ- मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. गेवराई शहरासह सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूनेही प्लेक्स लावण्यात आले आहेत. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडीत यांच्या या बॅनरमुळे विधानसभा क्षेत्रात सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचे म्हटले होते. शिवाय माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांना दहा लक्ष रुपये मदत पुरवल्याचाही आरोप केला होता.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या आरोपा नंतर आमदार विजयसिंह पंडीत यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काल गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले. लक्ष्मण हाके यांच्या आरोपां विषयी आमदार विजयसिंह पंडीत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी आमदार म्हणून नाही तर एक समाज घटक म्हणून मतदार संघात मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासमर्थनार्थ बॅनर लावले आहेत.
पंडीत घराना शिवछत्र परिवार कायम इतरांच्या हक्कांना धक्का न लागता गरजवंत मराठ्यांना न्याय मिळावा या भूमिकेत कायम राहिला आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा हा गरजवंत मराठ्यांच्या हक्कांसाठी आहे. त्यामुळे पंडीत घराना शिवछत्र परिवार मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोनलात सहभागी आहे. हाके का फाके हा कोण आहे मला माहित नाही, पण हा ‘ प्रिपेड श्वान आहे, त्याला जेवढे रिचार्ज केले जाईल तेवढां तो भुंकतो’ अशा शब्दात आमदार पंडीत यांनी हाके यांच्यावर टीका केली.
आमदार पंडित यांच्या टीकेनंतर गेवराई मतदार संघात तणावाचे वातावरण असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार पंडीत यांना चॅलेंज देत आजच गेवराईत येऊन दाखवतो असे म्हणत आमदार पंडीत यांना डिवचले होते. त्या अणुषंगाने प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सायंकाळी 5:30 च्या दरम्यान लक्ष्मण हाके व त्यांचे समर्थक वाहनाने गेवराई शहरातून मार्गस्थ होत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाकेंचा ताफा दाखल होताच आमदार विजयसिंह पंडीत यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांच्या गाडीवर दगडफेक केली.
यावेळी पोलिस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना वेळीच पांगवले. त्यानंतर हाके यांनी गाडीच्या दरवाजा उघडून जमावासमोर दंड थोपटत वज्रमुठ आवळली. यावेळी दोन्ही बाजून प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. दरम्यान दगडफेकीनंतर हाके यांनी दंड थोपटत वज्रमुठ आवळल्याने आमदार पंडीत यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हाके यांच्या सोबत आलेल्या समर्थकांनी हाके यांच्या गाडीवर चढून हाता काठ्या भिरकावत घोषणाबाजी केली.



Comments