मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
- Navnath Yewale
- Aug 24, 2025
- 2 min read

मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यामागणीसाठी मराइा आंदोलक मनेाज जरांगे पाटील रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाईल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. येत्या 29 ऑगस्टला मुंबई मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यभरात 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो. यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसुंबा येथे सभा घेत येत्या 29 ऑगस्टला मुंबई मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
मराठा समाजासाठी महायुती सरकाने केलेले काम सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचे सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते आरक्षण सुरू आहे . आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र सरकाने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे पुढेही आम्ही काम करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शका असण्याचे कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, अशी भूमिका सीएम फडणवीस यांनी मांडली आहे.
महायुती सरकारच्या काहात मराठा समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना राहण्यासाठी आपण त्यांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त आला पाहिजे, यासाठी सारथी संस्थेसोबत आपण काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक आयएएस अधिकारी सारथीच्या माध्यमातून तयार केले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक एमपीएससीचे विद्यार्थी तयार केले आहेत, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.



Comments