top of page

मराठवाड्यात पावसाचा कहर! नांदेड, बीड, हिंगोली मध्ये सहा जणांचा मृत्यू


ree

मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. आत्तापर्यंत नांदेड आणि बीडमधून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरात बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीमसोबत मिलिटरीही दाखल झाली आह . ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी शाळेच्या सुट्टीबाबात मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अडकलेल्या नागरीकांना राहण्याची सोय करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.


राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने तांडव घातले आहे. लाखो हेक्टर शेतीचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत तर पावसाने अक्षरश: कहरच केला आहे.

मराठवाड्यातील पावसाच्या स्थितीबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीनुसार बचावकार्यासाठी एनडीआरएफचे जवान मराठवाड्यात दाखल झाले आहेत. जितेंद्र पापळकर यांची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत फडणवीसांनी पावसाचा आढावा घेतला असून आवश्यक ते सर्व निर्देश दिले आहेत.


ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी शाळेच्या सुट्टीबाबत सूचना फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अडकलेल्या लोकांना राहण्या खाण्याची सोय करण्याचाही सूचना फडणवीसांनी दिलेल्या आहेत. सध्या नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती असली तरी या पावसामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पावसामुळे मराठवाड्यात आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेडमध्ये तिघांचा, बीडमध्ये दोघांचा तर हिंगोलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातून मागविलेली मिलिटरीची 20 जवानांची टिम नांदेडकडे रवाना झाली आहे. बीड जिल्ह्यातही एनडीआरएफची टिम तैनात करण्यात आली आहे.


मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील सव्वालाख हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. सध्या पाऊस सुरू असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीच गंगाखेड गौडगाव येथे अतिवृष्टीसदृश्य जोरदार पाऊस झाला.


शेतात उभे असलेले कापूस आणि सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. शेतकर्‍यांनी मेहनतीने लागवड केलेल्या कापसामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने कापसाचे आणि सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. शेतकर्‍यांनी मेहनतीने लागवड केलेल्या कापसामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने कापसाचे आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांमध्ये शेतकर्‍यांनी पोहोत आम्हाला लडकी बहीण योजना नको, पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी केली आहे. शेतात पाणी साचल्याने कापसामध्ये मासे सोडायची वेळ आली असे म्हणत शेतकर्‍यांनी राग व्यक्त केला आहे.



परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात काल रात्री एक कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण बसले होते त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळा गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.


दरम्यान, परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने फोर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरूण गाडीमधून जात असताना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत.


पाण्याचाा आंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोन वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत दोर पोहोचत नव्हता, त्यामुळे पाण्यामध्ये जाऊन पोलिसांनी स्वत:च्या आणि त्या युवकांच्या कंबरेला दोन बांधून त्याला रात्रीच्या अंधारात बाहेर काढले. तिघा तरुणांना वाचवण्यात यश आले.


परंतू विशाल बल्लाळ हा पुणे येथील रहिवाशी असून त्याला पोहता येत नसल्यामुळे तो भयभीत झाल्याने कुठल्याही झाडाला पकडू शकला नाही. त्यामुळे तो एका बाभळीच्या झाडाला अडकलेला अढळून आला त्याची डेड बॉडी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी पाठवून दिली आहे.


नांदेडमध्ये मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. गंगाबाई मादळे आणि भीमाबाई मादले यांचे मृतदेह सापडले आहे. अन्य चार जे पाच जणांचा शोध सुरू आहे.


त्याचबरोबर माजलगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे. या, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे.


Comentarios


bottom of page