मराठा आंदोलकांचा प्रताप सरनाईकांना घेराव; पालकमंत्री सरनाईकांनी फोनवरुन अधिकार्याचे कान टोचले
- Navnath Yewale
- Jul 19
- 1 min read

नोंदीचे पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केल्याचा आरोप करत धारशिवमध्ये आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. मराठा आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं दिसून आलं. मंत्री सरनाईक यांनी आंदोलकांचं गार्हान ऐकून तात्काळ सबंधीत अधिकार्याची फोनवरून चांगलीच कानउघडणी केली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्हा दौर्यावर होते. पुरावे असतानाही जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र रोखण्यात आल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी थेट पालकमंत्री सरनाईक यांनाच घेराव घातला. आंदोलकांशी चर्चा करत पालकमंत्री सरनाईक यांनी सबंधित अधिकार्यास फोनवरून चांगलेच फैलावर घेतले. पुरावे असणार्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. याआधी दोनवेळा आदेश देऊनही कामं होत नाहीत, म्हणत त्यांनी अधिकार्याचे चांगलेच कान टोचले.
कुणबीच्या नोंदी असतानाही जात वैधता समितीकडून प्रमाणपत्र दिले जात नाहीत. शैक्षणिक वर्षारंभ होत असल्याने जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलकांच म्हणणं ऐकून घेत असतानाच पालकमंत्री सरनाईक यांनी पाडताळणी समितीच्या सबंधित अधिकार्यास फोनवरून संवाद साधला. सरनाईक अधिकार्यास म्हणाले की, या आधीही, दीड महिन्यापूर्वी याच संबंधीत फोन केला होता.
पण अजूनही समस्या सुटत नाही, तुमच्यामुळे शासनाला आणि आम्हाला त्रास होत असले तर हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्याकडे चार्ज असतानाही काही कार्यवाही का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत तातडीने या प्रकरणात लक्ष घाला आणि कार्यवाही करा अशा सुचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.



Comments