top of page

महादेव मुंडे प्रकरण काही पोलिसांनी मिटवण्याचा प्रयत्न केला-आमदार सुरेश धस

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख पंकज कुमावत नुकतेच बीड मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी तपासाची चक्रे फिरवल्या नंतर पहिल्यांदाच पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौर्‍यावर होते यावेळी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्ते प्रकरणा बरोबरच बापु आंधळे यांच्या खूनाचाही तपास व्हावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

ree

बीड जिल्ह्यातील जनतेचे 7 हजार कोटी रुपये मल्टिस्टेट, पतसंस्थेत अडकले. याच पार्श्वभूमिवर आज पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिड दौर्‍यावर होते. पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हअधिकारी कार्यालयात स्थानिक आमदार, पदाधिकारी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.


पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवारी (5 ऑगस्ट) बीड जिल्हा दौर्‍यावर होते. सायंकाळी उशीरा अजित पवार यांनी जिल्हाअधिकारी कार्यालयामध्ये मल्टिस्टेट घोटाळ्या प्रकरणी प्रशासकिय वरिष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक आमदार, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. छोट्या ठेवीदारांना ठेवी परत देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.


बैठकीनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी जिल्हाअधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी संवाद साधला. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटीचा तपास व आरोपींच्या अटकेबाबत बोलताना धस म्हणाले की, एसपी प्रमाणीक परंतु एसपींना त्यांचे सबऑडीनेट चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे अडचणी निर्माण होतात. आणि जे काही मकोका मधले आरोपी आहेत, मकोका लावण्याचं काम एसपींनी जोरात केलं. मकोकातले आरोजी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हासत्र न्यायालयात येऊन जात असतील, त्याच्यानंतर जो हा गोट्या गित्ते महादेव मुंडे च्या प्रकरणातही संशयित आहे बापु आंधळे खून प्रकरणातही संशयित आहे.


आणि त्याचे कारणामे मी सांगण्याची गरज नाही जवळपास सर्वच माध्यमांनी ते घेतलेले आहेत. अशा प्रकराचे आरेापी जे गोट्या गित्ते सारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे गोट्या गित्ते मकोका मध्ये पाहिजे आहे. महादेव मुंडे प्रकरणात आता कुमावत यांची नियुक्ती, एसआयटीची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी तडका फडकी केलेली आहे. तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे, मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर बसून तो जर वक्तव्य करत असेल तर मला वाटत बीड जिल पोलिसांच्या दृष्टीनं बिल्कुल चांगल नाही. आजुनही परळीतली चौकशी होईल, आणि महादेव मुंडे प्रकरणात मिटवा-मिटवीचं काम काही पोलिसांनी त्याठीकाणी केलंलं आहे.


निश्चित ज्ञाणेश्वरी मुंडे त्यांची नावे कुमावत यांना सांगतील. हे प्रकरणं अशा प्रकरच्या हिंमती होवू शकतात का? बापु आंधळेच्या प्रकरणामुध्ये बापु आंधळेला तुम्ही, महादेव गित्तेने समोरुन गोळी झाडली म्हणता मग समोरुन गोळी लागायला पाहिजे होती. प्रत्यक्षात बापु आंधळेच्या कानाच्या मागून गोळी लागलेली आहे. मग त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडे प्रकरणाबरोबर बापु आंधळेच्या खुनाचा तपास झाला पाहिजे. महादेव मुंडे आणि बापु आंधळे प्रकरणात सेम आरोपी आहेत.

त्यात काही लोक नाहीत त्यांचीसुद्धा जानिपूर्वक नावं घेण्यात आली आहेत. म्हणून जेवढं काही सबऑडिनेटवरती एसपींनी अवलंबून राहू नये, स्वत:ची निर्णय क्षमता चांगली आहे. बर्‍यापैकी केसेस त्यांनी वाढवलेल्या आहेत. कोणी जरी तक्रार केली तर तत्काळ अ‍ॅक्शन घेतात. त्यामुळं भितीचं वातावरण काही प्रमाणात की झालं आहे पण क्राईम रेट मात्र पाहिजे तेवढा कमी झालेला नाही त्याला काही कालावधी लागेल. एसआयटी प्रमुख पंकज कुमावत यांनी प्रशिक्षण कालावधीत केजमध्ये काम केलं आहेत. त्याकाळात जिल्ह्यातील अवैध धंदे बर्‍यापैकी बंद केले होते. त्यांच्या कामाची पद्धत खोलवर जाऊन तपास करण्याची आहे.


त्यांनी ज्याला काही माहिती आहे त्यांनी थेट संपर्क साधून माहितीचे आवाहन केलं आहे. काही लोकांनी स्टेटमेंट केलेलं आहे. तत्कालीन एसपी मिना यांनी केवळ बाळा बांगर यांचं स्टेटमेंड लिहून घेतलं. आणि ती स्टेटमेंट कॉफीसुद्धा परत दिलेली नाही. ती कॉफी आता त्यांच्या खिशात घालून गेलेत का जागेवर ठेवलंय हे आता पंकज कुमावत साहेबांनी पाहावं. परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडोओ हा विषय थोडाच राहिलेला आहे. परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील की फक्त बोटांना शाही लावयची आणि माघारी जायचं बटनं कोण दाबत होत 200 बुथवर एक लाख 40 हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले हे लोकांना माहित आहे. ही त्यांची माणसिकता आहे.


व्हिडिओ व्हायरल करणं, संपूर्ण कंबरड मोडायला काही दिवस लागणार आहेत. आताही ‘ आका कमींग सून, बहूत जल्द वापस आ रहे है’ हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत, पाकिस्तानचे दिडीक हजार सैनिक मारून आलेत काय हे , यांची हात्तीवरून मिरवणूक काढायला. माणसं मारले धडधडीत इथलेच. आणि तो पटेल पट्टेदार होता त्याच्या पासून सुरुवात झाली 40 लाखात मिटवला पट्टेदार. आणि मग किडे मुंग्यासारखे गेलेत हे लोक. संतोष देशमुख काय सांगता, संगित दिघोळे, बडु मुंडे, बापु आंधळे, महादेव मुंडे कोण आहेत. तुम्ही तुमचेच माणसं मारता आणि इकडं संतोष देशमुख यांची बाजू घेतली की आम्हाला जातीवादी म्हणता.


आणि हे काय आहे. 43 गुन्ह ज्यामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न करणारे आसे लोक तुम्हाला जवळ कशासाठी ? माणसं मारायला. माणसं मारायचे एकाने फिर्याद द्यायची एकाने आरोपी चौथे करायचे आणि जेलममध्ये पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी परिस्थती परळीमध्ये झालेली आहे. आणि परळी सोडून ते पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये बाहेर हात टाकायला गेले आणि त्यातलं मस्साजोग जे गाव आहे. ज्या गावाच्या नादी लागायला नको होतं त्या गावाच्या नादी लागून बसले. देशमुख कुटुंब आणि साक्षीदार स्ट्राँग आहे. सीआयडी आणि एसआयटीने एवढा स्ट्राँग तपास केलेला आहे की खंडणी, मोका, 302 सर्व एकत्रीत केलेलं आहे. आम्ही संतोष देशमुख यांची बाजू घेतली आणि दुसरा काय आंधार हे महादेव मुंडे कशासाठी ते बंडू मुंडे एक कोटीसाठी महादेव मुंडे 12 गुंठ्यासाठी बापु आंधळे कोणाची तरी नावं घेण्यासाठी. अशा पद्धतीचे प्रकार त्याठीकाणी झालेले आहे. हे सर्व प्रकार उघडकीस आले पाहिजेत.


आम्ही त्यांची बाजू त्यासाठीच घेतोत. सुशील कराड हा लहान आहे. त्याच्याबद्द काही बोलणार नाही. महादेव मुंडे प्रकरणात त्याचं नाव नाही. सोशल मिडियावर चुकीची माहिती पसरवण्यात येते एसआटीप्रमुख बीडमध्ये येण्यापूर्वीच वाल्मीकच्या दोन मुलांची 17 तास चार जणांची कसून चौकशी अशा खोट्या बातम्या पसरवण्यात आलं. सोशल मिडियावर जे फिरलं त्याचं उत्तर सुशील कराड याने दिलं आहे. यावेळी ज्ञणेश्वरी मुंडे यांची प्रशंसा करत त्यांना मधल्या काळात कोणी ऑफर दिलेली आहे. त्यांची नावे एसआयटी प्रमुखांना त्या सांगतिलच. 12 गुंठे जमिनीसाठी वाद झाला तिच जमिन परत ज्ञाणेश्वरी मुंडे यांच्या नावे करून देतो अशी ऑफर कोणी दिली?


काही पोलिस कर्मचारी त्यांचं मोबाईलचं डिटल तपासा हे पोलिसांचं काम करतात का आका आणि त्यांचे तत्सम आहेत त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होणार असल्याचा दावाही आमदार सुरेश धस यांनी यावेळी केला.

Comments


bottom of page