महादेव मुंडेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारू - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Jul 21
- 2 min read
जरांगे पाटील यांनी आज स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, आरोपींना तत्काळ अटक करा, राजकीय नेत्यांसाठी कायमस्वरुपी जिल्हा बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज परळी (जि.बीड) येथे स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या हत्तेला 18 महिणे लोटले असले तरी मारेकरी अद्याप मोकाट आहेत. न्यायासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी मागील आठवड्यात पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रसंगी जरांगे पाटील यांनी ज्ञाणेश्वरी मुंंडे यांना फोनवरून काळजी घेण्याचा सल्ला देत भेटीचे अश्वासन दिले होते.
जरांगे पाटील यांनी आज सोमवारी (21 जूलै) परळी येथे महादवे मुंडे यांच्याकुटुंबीयांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे, दोन मुले, आई- वडिल यांच्या सांत्वनपर भेटीत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना महादवे मुंडे यांच्या स्वभावासह त्यांचा राजकारण्यांशी कसलाही संबंध नसताना त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली.
बाळा बांगर यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासे केल्यानंतर हत्तेचा क्रूरपणा उघडकीस आल्याचेही ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या. महादवे मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवालातूनही धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बाळा बांगर यांच्या दाव्यानुसार महादेव मुंडे यांच्या मानेचा काही भाग गायब असल्याचा स्पष्ट उल्लेख शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आला आहे. त्यानुंसार बाळा बांगर यांच्या दाव्यांना वाव मिळत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
न्यायासाठी प्रशासन दरबारी खेट्या मारल्या वारंवार पाठपुरवा केला, तात्पुरता तपास सुरू होता आणि लगेत बंद केला जात असल्याचा प्रकार त्यांनी जरांगे पाटील यांच्या समोर सबळ पुराव्यानिशी मांडला. दरम्यान या प्रकरणात तपासत अडथळा निर्माण व्हावा म्हणून सातत्याने तपास अधिकारी बदलण्यात आल्याचा खुलासाही ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी केला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एवढी क्रूर हत्या झाली तर आतापर्यंत आरोपींना अटक नाही हेच आश्चर्य आहे. एखादा व्यक्ती जबादारीतून स्टेटमंड देत असेल तरी मुख्यमंत्री गप्प का आहेत? त्याच क्षणी मुख्यमंत्र्यांनी आदेश देवून यातील आरोपींना ओढत आणण्याचा आदेश द्यायला पाहिजे. असे गुंड वापरून सत्ता टिकवता येत नाही, अस जर एक-एक घर जर तुमच्या विरोधात गेलं तर राज्यातील सर्व जनता तुमच्या विरोधात कधी जाईल हे तुम्हाला माहित पण होणार नाही.
महादेव मुंडेच्या कुटुंबीयांच्या न्यायासाठी शुक्रवारी (25 जूलै) परळी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, येत्या 25 तारखेच्या आत महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाठी एयआयटी, सीआयडी गठीत करावी आणि आरोपींना अटक करा अन्यथा आम्ही राजकीय नेत्यांसाठी कायमचा जिल्हा बंद करू, आरोपी अटक होईपर्यंत जिल्हा बंद ठेवू प्रसंगी राज्य बंद करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाहीत. आमचा अंत पाहू नका मी जर एखाद्या मॅटरमध्ये घुसलो तर त्याचं काय होतं. या प्रकरणात जेवढे यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत त्यांचे सर्वांचे कॉल डिटेल्स काढा आणि आरोपींना अटक करा.
न्यायासाठी हे कुटुंब मुख्यमंत्र्यांना वेळ मागत आहे, तुमच्याकडे पाच मिनिट वेळ या कुटुंबाला द्यायला. तुम्हाला गुंड संभाळाचे का सामान्य जनता हे अगोदर पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे त्यानंतर मुख्यमंत्री- गृहमंत्री यांनी ठरवावं. मी एकदा तर्हाला लागलो तर मागे हटत नसतो. तुम्हाला आरोपींची नावं सांगून त्यांना अटक करत नाहीत, मुख्यमंत्री तुम्हाला वाटतं का? तुम्ही जे हाताखाली राजकीय गुंड पाळलेत त्यावर राज्य चालेल. अन जर आम्ही आलो तर. आरोपींना वेळीच अटक करा अन्यथा पुढची लढाई सुरू झाली असं समाजाचं असेही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे.



Comments