महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए ?; निशिकांत दुबे, शेलारांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंकडून समाचार
- Navnath Yewale
- Jul 7
- 1 min read

झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या मराठी-हिंदी वादात उडी घेऊन राज ठाकरे आणि मराठी माणसाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. तर भाजप नेते आशीष शेलार यांनी काल (रविवार 6 जूलै) महाराष्ट्रात हिंदी बोलणार्या व्यापार्यांना झालेल्या मारहाणीची तुलना थेट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी केली होती. या दोन्ही वक्तव्यांवरप आता शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मिडियाच्या एक्स वर पोस्ट करत भाजपवर जोरदार हल्ला चढवत “ महाराष्ट्र द्वेष हाच खरा भाजपचा डीएनए आहे ” असा संताप व्यक्त केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की “ भाजप दररोज महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे. भाजपने मराठी माणसाची, महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केल, ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयाशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आदित्य ठाकरे म्हणाले की, “ आज भाजपचा तो खासदार ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे. प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्र द्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे ? ” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुढच्या काही दिवसांत, भाजप अत्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या ‘ प्लेबुक’ जाळ्यात अडकू. हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधी द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा, हीच भापची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे. असेही आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले.



Comments