top of page

अखेर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; अजित पवारांनी स्वीकारला, मुख्यमंत्र्यांकडू सुपूर्द

ree

मुंबई: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्यानंतर कालपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली. अखेर आज त्यांचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांनी स्वीकारला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला आहे.


माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या विरोधात शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात येत होती. विरोधकांनीही यावर रान उठवले होते. अखेर आज त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, “ मा. न्यायालयाच निकालानंतर महराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे.”


कायदे- नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीमाना तत्वत: स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.


अजित पवार पुढे म्हणाले, सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रमाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा- व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनेतेच्या विश्वासाल तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.


मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणार्‍या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाट आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नुकतेच त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर ते आजारी असल्याचे सांगून लिलावती रुग्णालयात दाखल झाले.


कमी उत्पन्न असणार्‍या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. अ‍ॅड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाकिश शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केला. इतकेच नव्हे तर, या इमारातीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकून चार जणांविरुद्ध बनावट दस्ताऐवजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरुन चार जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments


bottom of page