top of page

धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार!, पंधरा दिवसांपासून फिल्डींग - करुणा मुंडे

ree

बीड: राज्याचे क्रिडा मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी अखेर आज राजीनामा दिला. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली होती. हिवाळी अधिवेशनातच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद द्यायचं होतं. अमित शाहांकडे मंत्रिपदाची फिल्डींग लावली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या करुणा मुंडे च्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या गुन्ह्यावरून नाशिकच्या जिल्हा सत्र न्यालयाने अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षची शिक्षा सुनावली. नैतिक जबाबदारी म्हणून आज माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढील कार्यवाहीसाठी अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.


मात्र, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाणार, त्यांनी अमित शाहा कडे फिल्डींग लावली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी पंधरा दिवसांपासूनच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात येणार होतं. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी नुकतीच दिल्ली येथे अमित शाह यांची भेट घेतली. प्रसंगी धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.


करुणा मुंडे यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यासाठी मागील काळात अजित पवारच अग्रही असल्याचे दिसून आले होते. कथित कृषी घोटाळ्यात मा. न्यायालयाकडून क्लिन चिट मिळाल्यानंर अजित पवार यांनी माध्यमांसमोर “धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्यात क्लिन चिट मिळाली तशी इतर चौकश्या सुरू असलेल्या प्रकरणातही मिळाली तर त्यांचा विचार करण्यात येईल ” असे सांगितले होते. त्यावर अजित पवार यांच्या वक्तव्यांचा सोशल मिडीयासह प्रत्यक्षात विरोध करण्यात आला होता.


धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा खंडणी आणि सरपंच सतोष देशमुख यांच्या निर्घुन खूनाशी थेट संबंधामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. याशिवाय पिक विमा, कृषी विभागातील कथित घोटाळ्यांच्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या जागी ओबीसीलाच संधी म्हणून सुरुवातील डावलण्यात आलेले व नाराज राष्ट्रवादीचे ज्येष्ठे छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली.


दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या जागी ओबीसी छगन भुजबळ यांना संधी या सूत्रानुसार माणिकराव कोकाटे यांच्या जागी खुल्या प्रवर्गातील आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र, मतदारसंघातील विकास कामांसाठीच अमित शाह यांची भेट घेतल्याचे धनंजय मुंडे यांच्याकडून ठणकावून सांगण्यात येत असले तरी, मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री, राज्याचे मंत्रीमंडळ डावलून थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत एका विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पोहोचणे हे सामान्य जनतेलाही न रुचण्यासाखं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडेंनी मंत्रीपदावर वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावल्याचा करुणा मुंडे याच्या दाव्यात तथ्य आहे सध्यातरी असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे बीडमध्ये ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश सोळंके तरुण युवा नेतृत्व म्हणून विजयसिंहराजे पंडित या आमदारांची तगडे दावेदार आहेत.


धनंजय मुंडे भाजपत जाणार? :

राष्ट्रवादीकडून आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले तर, नेहमीच भाजपच्या अगदीच जवळचे व पुर्वगृहीचे भाजपचेच धनंजय मुंडे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे करुणा मुंडे यांच्या दाव्यांना वाव मिळत आहे.

Comments


bottom of page