top of page

महाराष्ट्राला नको असलेली व्यक्ती मंत्री झिरवाळांच्या जागी आणण्याचं ‘चौकडी’ चं षडयंत्र - रोहित पवार

आम्ही दु:खात, त्या चौघांचे तिथे राजकारण सुरू होतं; इच्छा नसताना सुनेत्रा काकींना चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात आहे, असा आरोप करत अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी सुरुवातीपासून प्रकरण लावून धरले. रोहित पवार यांनी शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतिर्थ परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांवर निशाना साधला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत सुरुवातीपासूनच रोहित पवार, अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास केंद्रीय यंत्रणेसह सीआयडी मार्फत सुुरू आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या दाव्यानुसार आज अजितदादांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएचा प्राथमिक अहवाल सादर होणार आहे.


तत्पूर्वी दि.24 फेब्रूवारी डीजीसीएकडून व्हीएसआर कंपनीच्या जेट विमानाच्या उड्डाणावंर प्रतिबंधीत कारवाई केली. त्यानुसार रोहित पवार यांनी मंत्रालय कार्यक्षेत्रातील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जबाबदार कंपनीसह डीजीसीएतील अधिकार्‍यांवर एफआयआरची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही, त्यानंतर गुरुवारी दि.25 बारामती पोलिस ठाणे गाठून रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी पोलिस अधिकार्‍यांसमवेत दोन चर्चा करुन एफआयआर घेण्याची मागणी केली.मात्र, इथेही एफआयआर घेण्यात आला नाही, असा आरोप करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह डीजीसीएवर निशाना साधला.


रोहित पवार यांच्या बारामतीतील घडामोडींसोबत दुसरीकडे राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाचा उद्य झाला. गुरुवारी (दि.26) राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या एकदिवसीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष निवडीची घोषणा केली. तत्पूर्वी कार्यक्रमासाठी जय पवार (अजित पवार यांचे चिरंजीव) हे स्टेजवर आले असता त्यांना इतर ठिकाणी बसण्याचा सल्ला देत असलेला प्रफुल्ल पटेल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला.


कार्यक्रमानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षा सुनेत्रा पवार यांना बोलण्यापूर्वीच पत्रकार परिषद संपवली असाही आरोप करण्यात आला. याशिवाय आमदार सरोज आहिरे यांनी “अजित दादा असतानांही त्यांच्या जवळ जाऊ दिलं नाही, आता सुनेत्रा वहिणींच्याही जवळ जाऊ देत नाहीत” अशी भावना व्यक्त करत स्वपक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता अध्यक्ष निवडीच्या वेळी पोलिस तक्रारीच्या आडून राजकारण, स्टंटबाजी करण्यात येत असल्याचा अरोप रोहित पवार यांचे नाव न घेता केला.


दरम्यान, यासगळ्या प्रक्रियेवार आज रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सडकून टीका करत इशरा दिला. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील लिपिक लाच प्रकरणात जानिवपूर्वक झिरवाळांना अडचणीत आणायचं आणि महाराष्ट्राला नाको असलेला व्यक्ती त्यांच्या जागी बसवायचा असं चौकडींचं षडयंत्र असल्याचा घणाघात करत नाव न घेता रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला. राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या आरोपाचा रोहित पवार यांनी समाचार घेत इशरावजा ताकित दिली.


आम्ही काल पाहिलं पत्रकार परिषदेवेळी कोण सुनेत्रा काकुंच्या खाद्यावर हात टाकतोय, कोण तो तिथं जय पवार ला बसण्याचं सांगतोय. अजितदादांच आमदारांवर प्रेम होतं, महाराष्ट्रातल्या जनतेवर प्रेम होतं. सरोज आहिरे या म्हणतायत दादा होते त्यावेळसही त्यांच्याजवळ जाऊ दिलं नाही, आता वहिणीं आहेत त्यांच्या जवळही जाऊ दिलं जात नाही. आम्ही तिथं दु:खात होतो आणि ही चौकडी इकडं राजकारण करत होती. इच्छा नसताना सुनेत्रा वहिणींना चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. मग कोण राजकारण करतंय, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे.


आजित दादा प्रमाणेच सुनेत्रा वहिणी आहेत, सोपं समजू नका त्या पवारांच्या सुनबाई आहेत, अस्सा सज्जड इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.


रोहिती पवारांच्या मते ‘चौकडी’ कोण?:

रोहित पवारांच्या मते ‘चौकडी’ राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख चार नेते आहेत. अजितदादांच्या तेरवी नंतर रोहित पवार यांनी विलिनीकरणावरुन या चारही नेत्यांवर नाव न घेता आरोप केले आहेत. रोहित पवार यांच्या आरोपाला या चारही प्रमुख नेत्यांनी सोईने प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याकडेच रोहित पवारांचा रोख राहिला आहे.

Comments


bottom of page