top of page

महाराष्ट्रावर संकटाचे ढग; नांदेडमध्ये सर्वदूर ढगफूटीसदृश्य मुसळधार!

गोदावरी, लेंडी, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांना पूराचा वेढा शेकडो नागरिक आडकल्याची भीती , प्रशानाकडून बचावकार्य सुरू


ree


नांदेड जिल्ह्यात मुसळधार पासामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुखेड तालुक्यातील अनेक गावांना पूर आला आहे. हसणाळा, रावनगाव, भासवाडी आणि भिंगेली या गावातील शेकडो नागरिक पुरात अडकले आहेत.

राज्यभरता पावसाचा हाहाकर पाहावयास मिळत आहे, सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांना पूराने वेढा दिल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.


लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली व हसनाळ या गावांतील काही नगारिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडत आहेत.



हे सर्व नागरिक पूरस्थितीत अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाच्या एसडीआरएफ राज्य आपत्ती व प्रतिसाद दल, पोलिस, अग्नी शमन दल, क्युआरटी (सिघ्र प्रतिसाद दल) व स्थानिक शोध व तत्परतेमुळे यांची सुखरुप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले स्वत: लक्ष ठेवऊन आहेत तसेच उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसीलदार मुखेड हे घटनास्थळी तळठोकून आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णत: सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविले आहे.



मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हसणाळा, रावनगाव, भासवाडी, भिंगेली गावांना पुराचा वेडा पडला आहे. नांदेडमधील हसणाळा गावात अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

देगलूर- मुक्रमाबाद रस्त्यावर पुराचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे. रस्त्यावर असलेली एक कार पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तिला दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.


लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सध्या एनडीआरएफची पथकं अत्यंत धोकादायक परिस्थितीत बचावकार्य करत आहेत. पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक गुरे-जनावरं दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पूरग्रस्त नागरिकांची उपसमार सुरू असून त्यांच्या बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत.

नांदेड शहरात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. जुन्या नांदे शहरातल्या पुलालास पाण्याने वेढा दिला आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने पुराचा धोका वाढला आहे. त्यासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून 64,412 क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे . लवकरच आणखी देान दरवाजे उघडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



लेंडी नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हसनाळा गावात पुराचे पाणी शिरले आहे. रावनगाव याठिकाणी अंदाजे 225 नागरिक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.


भासवाडी गावात 20 नागरिक, तर भिंगेली गावात 40 नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. या सर्व अडकलेल्या नगारिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments


bottom of page