top of page

माजीमंत्री धनंजय मुंडेचा जरांगे पाटलांवर घणाघात; सर्वात मोठी मागणी थेट फडणवीसांनाच आव्हान


बीड: मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेेक गंभीर आरोप केले. मुंडेनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. यामध्ये यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला, असा आरोप केला. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर आरोप करणार्‍या मनोज जरांगे यांच्यासह माझी सबीआय,नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग करा, अशी मोठी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यासोबतच सीएम देवेंद्र फडणवीसांना वाईट वाटेल, मात्र बीडमधील यंत्रणा जरांगे यांना घाबरते, असा गंभीर आरेाप करत धनंजय मुंडेनी पोलिस यंत्रणेसह जरांगे पाटलांवर निशाणा साधला.


दरम्यान, जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. परळीतील जरांगे याचया आंदोलनाला सर्व काही मदत मीच केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठरावा पहिल्यांदा बीड जिल्हा परिषद व परळी नगरपालिकेत मीच मांडला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या संस्कारातून मी घडलो आहे.

माझ्या हातून मी जरांगे पाटील यांचे एकदा उपोषण सोडले आहे. मी आतापर्यंत एक सभा सोडलीतर जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले नाहीत. दोन प्रश्न विचाले होते त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिले नाहीत.


मराठा समाजाचा फायदा ओबीसीमध्ये आहे की? ईडब्ल्यूएसमध्ये फायदा अधिक आहे? हा प्रश्न विचारला होता तर त्याचे उत्तर त्यांनी आतापर्यंत दिले नाही, असेही मुंडे म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून राग आतापर्यंत गिळला आहे. मात्र, जरांगे यांनी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. याचर्चेसाठी एकत्र येण्याची आमची तयारी आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे पुन्हा राज्यातील समतोल राखण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी जरांगे पाटील यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

Comments


bottom of page