top of page

माझा आभिमन्यू केला जातोय, लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर

ree

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांने मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता हाके यांनी ओबसी नेत्यांवरच गंभीर आरोपक ेला आहे. ते म्हणाले की, समाजातील काही लोक मला जाणून बुजून डावलत आहेत. हे सांगत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले. ओबीसी आरक्षण वाचवायचे आहे हीच माझी प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले.


एका मुलाखती दरम्यान हाके म्हणाले की, शत्रूकडून माझ्यावर वार होत आहेत. मी थोडासा तणावात आहे. मला ट्रॅपमध्ये अडवले जात आहे. माझा कोणातही राजकीय हेतू नाही. सत्तेतील कोणत्याही मंत्र्यांच्या प्रभावाखाली येणारा नाही. मला प्रचंड त्रास झाला आहे. माझे दोन फोन बंद करावे लागले. माझ्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल येतात. हे लोक आध गोड बोलतात आणि मग अडकवतात.


बीडमधील सभेबाबत ते म्हणाले की, बीड मध्ये यापूर्वी अनेक सभा झाल्या आहेत. बीड मध्ये ओबीसी यांच्या भावनांना मी वाट करून दिली आहे. मी एक आंदोलक आहे मला कोणाचा अजेंडा राबवला नाही. कुठल्या ही नेत्याबद्दल मला बोलायचं नाही. नवनाथ वाघामारे यांची गाडी जाळण्यात आली यावरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ते आक्रमक भूमिका मांडताता आणि हेच समाज कंटक यांना बघवले नाही.


सुप्रीया सुळे यांच्याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ज्या जन्मजात सोन्याचा चमचा घेऊन आल्या आहेत. त्यांना काय समाजणार आहे. त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार का दिला हे दिसून येते. गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना हाके म्हणाले की, मनोज जरांगे पातळी सोडून बोलत होते तेव्हा कुणीही भूमिका घेतली नाही. पडळकर यांच्यावर बोलणार्‍यांनी आधी स्वत:च्या घराकडे बघावे असही हाके म्हणाले.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page