अमेरिका पुन्हा हादरला: व्हाईटहाऊस परिसरात वीस राऊंड फायर मुख्य हल्लेखोराचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प आत असताना भीषण हल्ला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. हल्लेखोराच्या संशयास्पद हालचालीनंतर तत्काळ सुरक्षा यंत्रणेने सुत्रे हाती घेत डोनाल्ड ट्रम्प यांना कार्यक्रमातून सुरक्षित बाहेर काढले. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा व्हाईट हाऊस परिसरतून हल्ल्याची घटना समोर आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात भीषण गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. तर गोळीबाराच्या घटनेनंतर गुप्तहेर खात्याने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत एक संशयित हल्लेखोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव व्हाईट हाऊस परिसरात लॉकडाऊन करण्यात आला होता. महत्वाची बाब म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं प्रशासनांने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, व्हाईट हाऊसबाहेरील एका मुख्य सुरक्षा तपासणी नाक्याजवळ शनिवारी (दि.23. सायंकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास एक बंदूकधारी व्यक्ती पश्चिम बाजूच्या व्हाईट हाऊसच्या गेटजवळ आला आणि त्याने तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या दिशेने अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी त्याने अंदाजे 30 गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन ऑफिसने या घटनेची माहिती दिली.ज्यामध्ये त्यांनी संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय या घटनेवही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते.
परंतु या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यांचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नसल्याचंही सिक्रेट सिर्व्हिसने स्पष्ट केलं आहे. मात्र, नुकतंच काही दिवसांपूर्वी वॉशिंगटन डीसी येथील ‘ व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर व्हाइट हाऊसजवळ पुन्हा अशाच प्रकारच्या गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण अमेरिका हादरुन गेली आहे.



Comments