बीड हादरलं: वाल्मिक कराडच्या सहार्याच्या मुलाने केला महिलेवर अत्याचार
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्या प्रकराणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या सहकार्याच्या मुलाने एका 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव असून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकख खळबळ उडाली आहे.
याबाबत महिती अशी की, महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीन या 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणात बीड शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापर्यंत आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे.
पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर हे वाल्मिक कराडचे सहकारी आहेत. किरण बांगर यांचा मुलगा अमर बांगर याने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे, त्याच्याविरोधात पोलिसांनी महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी अमर बांगर याची पार्श्वभूमी ही बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी जोडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आरोपी अजूनही मोकाट असून, त्याला अटक करण्यात आलेली नाही .
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहे, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटक असलेल्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी तुरुंगात देखील एका कैद्याला मारहाण करत धमकावल्याची माहिती समोर आली आहे. याची एक कथित ऑडिओ क्लिप देखील प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. यामुळे देखील मोठा गोंधळ उडाला होता.



Comments