top of page

माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालत, खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने नवा वाद!


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या, “ माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “ कोणी काय खावे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणार्‍या वारकरी समाजाचे दैवत पांडुरंगाला मांसाहर चालतो, असे म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा आदर करू शकत नसाल, तर किमान त्याचा अपमान तरी करू नका. पण शरद पवार यांच्या मुलीकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार?”


दरम्यान, या टीकेनंतर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते याला काय प्रत्यूत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, “ या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकी समाज देईल.”

Comments


bottom of page