top of page

मालेगाव स्फोट प्रकरणी कोर्टाचा निकाल, सर्व सात जण निर्दोष ; माध्यमांवर प्रतिक्रियांचं वादळ !



ree

मालेगाव (जि.नाशिक) येथील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (31 जूलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायलयात जाहिर करण्यात आला. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्धवस्त झालं. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. “ केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही ” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे. आता न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया समोर आल्या आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पाहिली प्रतिक्रिया दिले आह. ‘ दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी
मालेगाव बॉम्बस्फोटात सहा नमाजी ठार झाले आणि सुमारे 100 जण जखमी झाले. त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. एनआयएने या प्रकरणाचा तपास जाणीवपूर्वक निकृष्ट पद्धतीने केला, ज्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला स्थगिती मिळवण्यासाठी मोदी आणि फडणवीस सरकारने जशी मागणी केली होती, तशीच मागणी आता मालेगाव प्रकरणात करणार का? त्या सहा जणांचा खून कोणी केला?

मंत्री छगन भुजबळ
एवढ्या वर्षे ते प्रकरण चाललं आहे, कोर्टाने अनेक साक्षी पुरावे तपासले असतील. ठिक आहे आता कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल.

हर्षवर्धन सपकाळ
मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला का? तर झाला, लोकांचा मृत्यूही झाला का? तर झाला आरोपी गेले कुठं? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्या दोषींना पकडलं जायला पाहिजे आणि त्या दोषींना शिक्षा झालीच पाहिजे या उद्देशानं सरकार पुढे काय करणार आहे? हा एक प्रश्न अनुत्तरीत राहतो. शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या अतिसंवेदनशील, कार्यक्षम आणि या देशासाठी शहीद देखील झाले. त्यांनी या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे शोधले होते सापडले होते त्यांचं काय झालं? हा ही प्रश्न अनुत्तरीत आहे. दुर्दैवाने तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, हेमंत करकरे हे तिघेही हयात नाहीत. त्यामुळे आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी विद्यमान सरकारची आहे.

मंत्री दादा भुसे
गेल्या काही वर्षापासून भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून प्रॉन्सड केले जात होते. मला वाटकी या न्यायनिवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे. आणि म्हणून मा. न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो.

माजी खासदार इम्तियाज जलिल
या प्रकरणाला सतरा वर्षे लागले आणि या सतरा वर्षाचा तपास पाच न्यायाधीश झाले. एवढे सगळे साक्षीदार, पुरावे पडतळण्यात आले. हजारो पानांचे चार्जशीट, सप्लमेंट्री चार्जशीट करण्यात आली. आणि सतरा वर्षानंतर निकाल येतो की, हे सगळे लोकं ज्यांना आम्ही पकडलं सतरावर्षापूर्वी हे सगळे निर्दोष आहेत. मग प्रश्न असा उपस्थित होते की कोण आहे, दोषी कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तपास यंत्रणा, एटीएस देणार एनआयए देणार कोणीतरी केलं असेल.

Comments


bottom of page