top of page

माळेगाव कारखाना निवडणुकीपूर्वीच पडद्यामागे खलबतं; अजित पवारांनी केलं उघड

ree

महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या मोळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये अजित पवार गटाच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. तर दुसरीकउे या निवडणुकीच्या पडद्यामागे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती अशी माहिती खुद्द अजित पवारांनी सांगितली आहे.


मुंबईमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी जागांच्या संदर्भात अजित पवार गटाच्या पॅनलमध्ये येण्यासंदर्भात काही ऑफर दिली होती का?. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, या संदर्भात मला वरिष्ठांनी अशी कोणती माहिती दिली नाही, कुणी काही बोललं नाही. पण तिथले अध्यक्ष हे शिवाजीराव जगताप त्यांना तिथे एस.एन. जगताप वकिल म्हणून ओळखलं जातं. ते माझ्याशी तिथे बोलत होते. त्यावेळीस दोन ते तीन वेळा चर्चा झाली होती. अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यानंतर ‘ शरद पवारांच्या गटासोबत किती जागांवर चर्चा झाली, असं पत्रकारांनी विचारले असता , ‘ ते तुम्हाला सांगण्याचं कारण नाही; असं म्हणत अजित पवारांनी पुढे बोलण्याचं टाळलं.

खरंतर अजित पवारांकडे राज्याच्या अर्थखात्याची जाबाबदारी आहे. तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पण असं असतानाही त्यांना माळेगाव कारखान्याचं चेअरमन का व्हायचं? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. तर इकडे अजित पवारांच्या काकालाही हे फारसं रुचलेलं नाही. पत्रकारांशी अनौपचारीक गप्पांमध्ये शरद पवारांनी ती नाराजी बोलून दाखवली.


मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणुक लढलो नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असा सवाल शदर पवार यांनी केला.

Comments


bottom of page