मिरा-भाईंदरमध्ये मनसेचे खळखट्यात?; कार्यकर्त्यांची धरपड
- Navnath Yewale
- Jul 8, 2025
- 3 min read
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकरली; पोलीस आयुक्तांचा जमाबंदी आदेश

मुंबईत मराठी- अमराठी मुद्याने पुन्हा वातावरण तापलं आहे. मिरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यापार्यास मारहाणीच्या निषेधार्थ व्यापांर्यांनी मोर्चा काढून मीर भाईंदर बंद पुकारला. मात्र, मनसेनेही उत्तर म्हणून मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. पण पोलीांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. एवढंच नव्हे तर पोलीसांनी मनसे नेत्यांची मध्यरात्रीपासून धरपडक करून त्यांना ताब्यात घेतलं. शिवाय, पोलीस आयुक्तांकडून मिरा -भाईंदरमध्ये जमाबंदी आदेश जारी करण्यात आले. मनसेचे जिल्हा प्रमुख आशिष जाधाव यांना पोलीसांनी भल्या पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेतल्याने वातावरण चांगलेच तापले.
अमराठी लोकांना मोर्चा, बंद पाळण्यासाठी परवानगी आणि मराठीसाठी एकवटलेल्या आंदोलनकर्त्यांना मात्र मोर्चास परवानगी नाकारल्याच्या भावनेतून मिरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांसह सामान्य मराठी माणुस रस्त्यावर उतरला. संतप्त आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली.
पोलीस कारवाइमुळे संतप्त मनसे पदाधिकार्यांनी सरकारचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांना पालीसांनी ताब्यात घेतल्यामुळे मनसे पुन्हा एकदा खळखट्याक मोडवर जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे मिरा भाईंदरमध्ये पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात असून आंदोलनकर्त्यांना अडवलं जात आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमधे ताणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, मराठी मुद्यासाठी जमलेल्या लोकांची पोलीसांकडून धरपकड सुरु आहे. तसेच आंदोलन करणार्या अनेक महिलांनाही ताब्यात घेण्यात आलं असून पोलीसांनी त्यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं आहे. व्यापार्यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही? अमराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आम्हाला का नाही? सरकारची मराठी माणसावरच कारवाई का? असे अनेक सवाल येथे आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आले. मराठीएकजूटीचा विजय असो, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणांसह कार्यकर्त्यांचा संतापामुळे वातावरण तापलं आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
महाराष्ट्रात राहुनही मराठी माणसावरच अन्याय होत आहे. पोलीसांनी पूर्णपणे दडपशाही केली आहे, मला असं वाटतंय की मी गुजरामध्ये येऊन मोर्चा काढतोय, अरे मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये जाऊन मोर्चा काढायचा का? या सरकारचं डोेकं ठिकाणावर आहे का? पोलीसांनी धरपडक केलेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी, आंदोलकांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
आम्ही सामन्य व्यक्ती आहोत. आम्ही कोणत्याही जाती-धर्माविरोधात बोलत नाही आहोत, कोणाबद्दलही आम्हाला आक्षेप नाही, पण मग फक्त मराठीलाच विरोध का असा सवाल एका महिलेने विचारला. जेव्हा गुजराती, मारवाडी लोक रस्त्यावर उतरले, जय गुजरात म्हणाले तेव्हा सर्व बहिरे झाले होते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“ मी मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी बोलले म्हणून माझी धरपकड मुंबई पोलीस करत आहेत. ही कसली लोकशाही?”असा सवालही संतप्त महिलांनी केला. मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक सर्वसामान्य लोकही माय मराठीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक महिलांनाही पोलीसांनी ताब्या घेतलं आहे. मिरा रोड प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेणार आहेत. आणि या विषयावर चर्चा करणार आहेत. मिरा रोड पोलीसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमिवर मुंबई ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी मिरा रोड येथे पाहोचत आहेत. दरम्यान, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख हे आंदोलनस्थळी पोहोचण्या अगोदरच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने सामान्य मराठी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल:
मराठीसाठी आंदोलन करणार्यांना पहलगाममधील दहशवाद्याची उपमा देणारं भाजपच मराठी भाषेचा मारेकरी आहेत, या मारकर्यांना आता मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे. त्यांनी विषय काढलाच आहेत तर पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेलेत का? हे त्यांनी सांगावं, मिळत कसे नाहीत? गेले कुठे? ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्या घरामध्ये राहतात का? लाज वाटली पाहिजे एक तर तुम्ही हिंदूनाही वाचू शकत नाहीत आणि मराठी माणसांवर अन्याय करणारांची तुम्ही बाजू घेता. हे असले धर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत, याची लाज वाटते. याशिवाय मुळ भाजपा हा मेलेला आहे, त्यांची जो काही रुदाली चालू आहे,रुदाली हा हिंदी शब्द आहे. त्यामुळे त्यांनी जे काय उर बडवायला बाहेरच्या पक्षातले आधी आमच्या पक्षातले, राष्ट्रवादी, काँग्रेसचे इतर पक्षातले उरबडवे घेतले आहे. मेलेल्या भाजपचं दु:ख व्यक्त करायला सुद्धा इतर पक्षातून उरबडवे घ्यावेे लागतात असा घणाघातही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा
महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाही.. हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं ? आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल आणि विषय मागे पडेल असं होणार नाही मोर्चा निघणारच. हात तर भाजपचा दहशतवाद. मराठीसाठी एकवटलेला समान्य मराठी माणुस मोर्चाचं नेतृत्व करेल. मिरा रोड भाईंदमध्ये मोर्चा निघणार. व्यापार्यांना खुली सूट द्यायची आणि दूसरीकडे मराठी माणसांना आत टाकयचं ही पोलीसांची दडपशाही आहे, सरकारला याचे परिनाम भोगावेलागतील. भाजपच्या निशिकांत दुबे यांच्यासह अन्य नेत्यांचे प्रक्षोभक वक्तव्य पाहता यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत. आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कुठल्याही घाणेरड्या कॉस्परंशीला बळी पडणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद भडकवायचं षडयंत्र भाजप च चाललेलं आहे. याला आम्ही बळी पडणार नाहीत. महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला.



Comments