मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गचे काम प्रगतीपथावर
- Navnath Yewale
- Jul 10, 2025
- 2 min read
सागरी बोगद्याचा पहिला ब्रेक थ्रू ; 2.7 किमी लांबीचा बोगद पूर्ण

मुंबई ते अहमदाबाद हे आठ तासांचे अंतर तीन तासापर्यंत कमी करणार्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेनसाठी गुजरात आणि महाराष्ट्रात वेगाने काम सुरू आहे. या बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा गुजरात येथे सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. एकून 508 किमी मार्गापैकी 90 टक्क्याहून अधिक मार्ग उन्नत स्वरुपाचा आहे. मात्र, मुंबईतील बीकेसी स्थानक अंडरग्राऊंड असून येथून 21 किलोमिटरचा बोगदा खाणण्याचे काम सुरू आहे . या 21 किमी पैकी 2.7 किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) आणि शिळफाटा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या कामातली ही पहिले यश आहे. याच बोगद्यातील 7 किमीचा भाग हा ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे.
मुुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या बोगद्याच्या पहिल्या अप्याचे 2.7 किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे बांधकाम 9 जूलै रोजी पूर्ण झाले आहे. एकून 21 किमी लांबीच्या बोगद्यांपैकी 5 किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोली दरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे. तर उर्वरित 16 किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन ( टीबीएम) वापरून बांधला जाणार आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखाली 7 किमी लांबीचा सुमद्राखालील भाग देखील समाविष्ट आहे .
एनएटीएम भागात बोगद्याचे काम जलद करण्याासाठी , एक अतिरिक्त आपत्कालिन मध्यवर्ती बोगदा (एडीआईटी) बांधण्यात आला आहे. ज्यामुळे घणसोली आणि शिळफाटा बाजूने एकाच वेळी बोगदा खणण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत, शिळफाटा बाजूने सुमारे 1.62 किमी खोदकाम करण्यात आले आहे आणि एनएटीएम विभागात एकून प्रगती अंदाजे 4.3 किमी आहे. आजूबाजूच्या भागाला कोणतेही नुकसान न करता अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रितपणे बोगद्याचे काम करण्यासाठी ग्राऊंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इनक्लीनोमीटर,स्ट्रेन गेज आणि बायोमेट्रिक एक्सेस कंट्रोल सिस्टमसह साइटवर व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचा प्रकल्प जतानच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने राबवला जात आहे.



Comments