top of page

मुंबई-नवीमुंबई विमानतळाला जोडणार्‍या मेट्रो 8 मार्गाला मान्यता ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाच निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत कंत्राटदारांची बिले अदा करण्यापासून शासकीय जमिनीच्या भाडे पट्टी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत मुबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणार्‍या मेट्रो 8 ला मान्यता देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. सोबतच समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नगापूर- गोंदिया, भंडारा-गडचिरोली महामार्ग कामास गदी द्यावी असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.


औद्योगिक प्रशिक्षणद संस्थामध्ये ‘ पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार. पीएम सेतू मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळणे सोपे होणार (कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता)


कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म , सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा (सार्वजनिक बांधकाम), धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन होणार, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस (वस्त्रोद्योग) वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणार्‍या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार, विशेषत: 30 वर्षांसाठी भाडेट्ट्याने देण्यात येणार्‍या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)


केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)


दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे मुद्दे : समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्गास गती द्यावी, प्रकल्पांचे कामेत विहित कालावधीत पूर्ण करावी, प्रकल्प रेंगाळू नये, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे, त्यानंतर प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा, प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात.


प्रकल्प मान्यता

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो मार्ग 8 च्या जोडणीस मान्यता देण्यात आली आहे. मार्गाची एकून लांबी 35 किलोमिटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमिटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके,6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत स्टेशन


असतील. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकांपर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमिटर, 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित


नाशिक शहर परिक्रमा मार्ग : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती, मार्गाची एकून लांबी 66.15 किलोमिटर या प्रकल्पासाठी एकूण 3 हजारा 954 कोटीच्या खर्चास मान्यता. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे- कोनसरी - मूळचेरा-हेदरी-सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमिटर लांबीस मान्यता. चार पदरी सिमंट काँक्रिटकरणाचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

Comments


bottom of page