मुंबईच्या नोकर्या परप्रांतियांना?, इकडे चार पैसे मिळाले की.. राज ठाकरे यांनी घेतला समाचार
- Navnath Yewale
- Jan 12
- 2 min read

मुबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीचे मदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेवली आहे. सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान, मुंबईतील विविध मुद्यांवरून ठकारे बंधू चांगलेच आक्रमक झाले. एका वाहिणीच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
मुंबईच्या राजकारणात सुरुवातील दक्षिणेकडील लोक बँका आणि इतर चांगल्या नोक्या घेत असल्याने त्यांच्यावर टीका होत असे. नंतर उत्तरेकडील आणि आता जैन समाजकडे लक्ष वेधले जात आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. की विकसित राज्यांतून लोक येतात आणि विकसित महाराष्ट्रात राहून आम्ही इथला विकास करू, असे म्हणतात. तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन तिथे विकास करा, तुम्हाला तिथे काही करता आले नाही म्हणून रोजगारासाठी मुंबईत आलात. पैसे कमावल्यावर उर्मटपणे बोलता, पण, महाराष्टाने तुमच्यावर उपकार केले आहेत हे विसरू नका असं राजठाकरे यांनी परप्रांतिय विरोधकांना सुनावलं.
बाहेरील लोकांनी स्वत: विचार करावा की कोण त्यांचा फायदा घेतय किंवा त्यांचा वापर करतंय. त्यांना हे समजले पाहिजे. अन्यथा ते फक्त इतरांच्या हातातील बाहुले बनतील. महाराष्ट्रात येऊन ते स्थानिक लोकांना दुर्लक्षित करतात, पण त्यांचे स्वत:चे राज्य सोडून येण्याचे कारण म्हणजे तिथली गरीबी आणि कमी संधी, इथे मिळालेल्या संधीचा आदर करावा आणि महाराष्ट्राच्या विकासात योदान देण्याचे अवाहनही त्यांनी केले.
मुंबईच्या नोकर्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मिळाव्यात, सांगली, सातारा किंवा कोल्हापूरच्या लोकांना नाही, या वादग्रस्त विधानावर राज ठाकरेंनी अश्चर्य व्यक्त केले. असे बोलण्याची हिंमत कशी होते? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे इथल्या नाकर्या आणि संधींवर पहिला हक्क महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचा आहे. बाहेरील लोक येऊन स्थानिकांना बाजूला करू शकत नाहीत. हे अन्यायकारक आहे आणि ते रोखले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. असे विधान इतर राज्यात केले असते तर तिथल्या नेत्यांनी काय केले असते? कदाचित कडक कारवाई केली असती. पण महाराष्ट्रातील नेते मात्र असे विधान सहन करतात आणि ते प्रोत्साहन देतात. हे दुर्दैवी असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करावे आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे. बाहेरील लोकांना मुंबईत येऊन स्थानिकांना आव्हान देण्याची परवानगी नसावी, असेही ते पुढे म्हणाले.
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना हिंदीबाबत बोलताना पाहून आश्चर्य वाटते, तुमच्याकडे भोजपुरी, अवधी, मैथिली सारख्या भाषा आहेत, त्यांचा अभिमान बाळगा. हिंदीच्या मागे का लागता? युपीतील चित्रपट भोजपुरीत येतात, हिंदीत नाही. यातून तिकडे स्वभाषेला प्राधान्य असल्याचे दिसते. प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे. इतर भाषा लादू नये असंही राज ठकारे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठकारे म्हणाले की, भाषा आणि धर्म यांचा काही संबंध नाही, मराठी, गुजराती, तामिळ बोलणारेही हिंदू आहेत. भारत हे वेगवेगळ्या भाषांच्या प्रांतांचे संघ आहे, जसे युनायटेड स्टेट्स. इतिहासात आक्रमणे झाली तरी आपण सण-उत्सव सोडले नाहीत. मराठीला अभिजा भाषेचा दर्जा मिळाला कारण ती 1500-1800 वर्षे जुनी आहे. हिंदीला अजून तो दर्जा नाही तरी ती लादली जाते. केरळ आणि कर्नाटकातही भाषावाद आहे, पण महाराष्ट्रात बोललो की देशाची एकता धोक्यात येते असे म्हणातात हिंदीची सक्ती नाकारली पाहिजे आणि भाषेचा आदर केला पाहिजे, असं यावेळी राठरे यांनी आवर्जुन नमुद केलं.



Comments