राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस, सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी; सुनेत्रा पवार लवकरच निवाडणुक अयोगाला नव्या कार्यकारिणीची यादी देणार!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या प्रचंड उलथापालथ आणि वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत. कालच उमपुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पाडली होती. या बैठकीत सुनील तटकरे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवल्यामुळे ही बैठक वादळी ठरली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकारिणीवरुन या सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली, त्यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुूसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक अयोगाला लवकरच दिली जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या दोघांनाही पदावरुन दूर केल्याची माहिती पसरली आहे.तसेच नवख्या लोकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणीची सुधारित नवी यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे. नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय घडामोडी घडतात, याकडे पाहणे औत्सुक्यचे ठरेल.
दरम्यान, मुंबईत असतानाही पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सुनील तटकरे यांचे भाषण सुरू होताच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याने नाराजीनाट्याला दुजोरा मिळत आहे. याचवेळी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याचेही वृत्त आहे. शिवाय 10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांरं आहेत, मेळावा मुंबईत होणार का पुण्यात? त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अर्थ खातं पुन्हा देण्यात आलेलं नाही अशी खंत व्यक्त केली.



Comments