मुंबईतील वांद्रे-लिंकिन रोडवरील स्क्वेअर मॉलला आग
- Navnath Yewale
- Apr 29, 2025
- 1 min read
मुंबईमधील 48 तासांत आगीची दूसरी घटना

मुंबईतील ईडी कार्यालयास लागलेल्या आगीच्या घटनेला 48 तासाचा कालावधी लोटतो ना लोटतोच मुंबईतील वांद्रे येथील लिंकिन रोडवरील स्क्वेअर मॉल इमारतीला आज मंगळवारी भिषण आगीची घटना समोर आली आहे. दरम्यान, चार मजली स्क्वेअर मॉलच्या तळघरात असलेल्या क्रोमा शोरुममध्ये अचानक आग लागली ती काही वेळातच इमारतीच्या सर्व मजल्यांवर पसरली.
क्रोमा शोरुमला लागलेली आग एवढी भीषण होती की, ती विझवण्यासाठी 13 अग्निशमन दल, एनडीआरएफ टीम, महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना तैनात करावे लागले. आग विझविण्यासाठी ‘फायर- रोबोट्स’ जम्बो वॉटर टँकरचा वापर करण्यात आला. सुमारे 9 तासांच्या बचाव कार्यानंतर, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांना आगीवर नियंत्रण मिळवता आले.
महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या मते, चार मजली मॉलचे मोठे नुसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, मॉलच्या वरच्या काचा फुटल्या आणि क्रोमा शोरुम जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही जीवत हानीचे वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून, मॉलला लागून असलेली इमारत देखील रिकामी करण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी मॉलच्या तळघरातील क्रोमा शोरुममध्ये अचानक आग लागली आणि काही वेळातच या आगीने संपूर्ण इमरातीला वेढले. मॉलच्या इमरातीतून निघालेल्या ज्वाळा आणि काळा धून दूरवरुन दिसत होता. आग सकाळी लागली असल्याने, त्यावेळी दुकानदार आणि कर्मचारी तिथे नव्हते सुदैवाने कोणतीही जीवत हानी झाली नाही.
दोन दिवसांपूर्वी ईडी कार्यालयाला लागली होती आग
दोन दिवसांपूर्वी 27 एप्रील रोजी मुंबईतील अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) इमरातीत आग लागली होती. बॅलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या ईडी कार्यालयाच्या इमरातीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर आणि अनेक फायली जळून खाक झाल्या.



Comments