top of page

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्दाचा आरोप

भाजप मंत्री, आमदारांकडून जरांगे पाटील यांच्यावर टीका




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीवरून मुंबईकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपमानास्पद भाष्य केलाचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणावरून भाजप नेते सोशल मिडियावर सकाळापासून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आता यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटीलयांना थेट इशारा दिला आहे.


प्रविण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, मात्र देवेंद्रजींची पैदास काढणं ही विकृती आहे. आम्ही त्यांना जरांगे म्हणायचो, दादा म्हणायचो. मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मराठा समाजाचे फक्त आपणच आहोत या आविर्भावात राहायचं. मुख्यमंत्र्यांच्या आईंचा जरांगेंनी अपमान केला आहे. शिवाराळ भाषा वापरली. आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हारा..बोलू का? तू कोण जरांगे? आपण आपल्या मर्यादेत राहा. अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.


पुढे बोलातदार प्रविण दरेकर म्हणाले की, सुसंस्कृत माणूस कोणीही असं बोलू शकणार नाही. जरांगे आंदोलन कर, मात्र असं काही बोलू नको. मराठा समाजाच्या प्रश्नांसोबत फितुरी करू नको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहनशील आहेत. ते चर्चा करतील, असा हल्लाबोल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. आता प्रविण दरेकर यांच्या टीकेला मनोज जरांगे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



नितेश राणेंचाही मनोज जरांगे पाटील यांनाा इशारा

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. नितेश राणे म्हणाले की, जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्या आई- बहिणींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी, मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



दरम्यान, भाजप आमदार परिणय फुके यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल मनोज जरांगे यांनी अपशब्द काढले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी मनोज जरांगेची जीभ हासडली असती. मनोज जरांगे यांनी जरा लगाम घालावा असाही हल्लाबोल आमदार परिणय फुके यांनी केला.

Comments


bottom of page