मोदी सरकार विरोधात टीका; लंडनवासी डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत अटक लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Navnath Yewale
- 17 hours ago
- 2 min read

मुंबई: लंडनवासी असलेले अनिवासी भारतीय आणि वैद्यकिय डॉक्टर, लेखक, कार्यकर्ते असलेले डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. कोविड काळात या महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्यानं वैद्यकीय मार्गदर्शन करत असत त्यामुळे ते चर्चेत आले होते. मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. मोदी सरकारवर सातत्यानं टीकात्मक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जाते.
असिम सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले आत्ताच (साधारण दुपारी 3 वाजता) त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं ताब्यात ठेवलेले आहे. खरं तर हे अन्यायकार आणि छळवादी आहे.
संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ. संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझं भाषणही आयोजित केलं होतं. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
असिम सरोदे म्हणाले की, मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तीश पावले उचण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये. कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वत:चा गैरवापर करू देऊ नये. अशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही. असंही असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,डॉ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळताच पुरोगामी वर्तुळातून सोशल मिडियावर या कारवाईविरोधात पोस्ट चा पाऊस सुरू झाला. सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवरांनी फेसबूक-ट्विटर पोस्टद्वारे सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. “ भारतात लोकशाही जिवंत आहे का? ” असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येता क्षणीच अटक केली याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सडेतोड राजकीय भूमिका घेणार्या डॉ. संग्राम पाटीलांना केलेली अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. नेमकी काय कारणामुळे अटक केली याचा मुंबई पोलिस आणि गृह मंत्रालयाने तातडीने खुलासा करावा. या दडपशाहीचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून धिक्कार करतो “ असंही सपकाळ म्हणाले.
डॉ. संग्राम पाटील यांच्यावरील कारवाईचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही निषेध करत आपल्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. केवळ मोदी सरकार विरोधात बोलल्याने डॉ. संग्राम पाटील यांच्यावर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा धिक्कार आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले.



Comments