सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय कार्यालयात शुकशुकाट! शिरुर कासारला वाली कोण? 22 जणांचा स्टाप, शिपाई वगळता सर्वच गायब!
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

बीड: शासनाच्या विकास कामासाची महत्वपूर्ण अस्थापना असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरुरच्या उप कार्यालयाच्या 22 जणांच्या स्टाफ पैकी केवळ महिला शिपाई वगळता सर्वजण गायब असल्याने रिकाम्या खुर्च्यांचे प्रदर्शन समोर आले. त्यामुळे कार्यालयाचा कारभार नेमका धाब्यावरून, हॉटेलवरून चालतो का? हा न उलगडणारा प्रश्न आहे.
तालुका निर्मितीपासून शिरुर कासार तालुका प्रशासकीय कार्यालयांना वारणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारणी शिवारात मा. न्यायालय इमारतीसह पंचायत समिती कार्यालय, ग्रामिण रुग्णालय, औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्था, क्रिडा संकुल आदी शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासर्व बांधकाम इमारातीचे प्रशासकीय व्यवस्थापन, नियंत्रण शिरुर कासारच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडे आहे. मात्र, या कार्यालयाचे शाखा अभियंता, उप अभियंता यांच्यासह कर्मचारी कायम गैरहज राहतात. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज परिसरातील हॉटेल, धाब्यावरूनच चालत असल्याचे बोलले जाते.

गुरूवारी कार्यालयीन वेळेत येथील कार्यालयात अक्षरश: शुकशुकाट दिसून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जबादारीचे भान हरपलेल्या कार्यालयीन अधिकारी कर्मचार्यांच्या दांडीयात्रेला लगाम लावण्यासाठी शिरुर कासार तालुक्याला वाली कोण? हा कायम न सुटणारा प्रश्न आहे.
अद्यवत प्रणाली खिशात : कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी कर्मचार्यांच्या उपस्थिसाठी थम्स, फेस अशा अद्यवत प्रणालीचा अवलंब करण्यात येत असला तरी. खासगी कामातून माया कमवत शासनाच्या पगारावर डल्ला मारणारे अधिकारी, कर्मचारी अद्यवत प्रणाली खिशात घालून फिरत आहेत. मोबाईद्वारे उपस्थितीचा फॉर्म्यूलाच मुळात गैरेहाजेरीला पाठबळ देणारा आहे. त्यामुळे वरिष्ठांकडूनच एकप्रकारे कामचुकार अधिकारी कर्मचार्यांची पाठराखन केली जात असल्याचे निश्चित आहे.

धाब्यावर उघडते कार्यालयाचे बाड: प्रशासकीय कामकाजामध्ये गोपनियतेचा अवलंब जबाबदार अधिकारी, कर्मचार्यांना बंधनकारक आहे. मात्र शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप कार्यालयाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी चक्क धाब्यावर कार्यालयाचे बाड उघडत असल्याचे चर्चा आहेत. त्यामुळे जबाबदार अधिकारी, कर्मचारीच प्रशासकीय कामकाजाच्या गोपनियतेचा धिंडवडे उडवत असल्याचे बोलले जात आहे.



Comments