top of page

राज्यात कायदा सुव्यवस्था उरली नाही, कायद्याचा धाक सामान्य लोकांनाच - दमानिया

Updated: Jul 23, 2025

हनी ट्रॅप प्रकरणी लवकरच तपशील देणार; शेतकर्‍यांना संवेदनशिल कृषी मंत्री हवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचे पत्रकार परिषदेत दावे


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले, कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. माणिकाराव कोकाटे यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा उल्लेख करून त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात अत्यंत भयानक आणि विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली नसल्याचे सांगत, कायद्याचा धाक फक्त सामान्य लोकांना असू शकतो, असे अंजली दमानिया म्हणाल्या.


अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याप्रकरणी दमानियांनी प्रतिक्रीया दिली. माणिकराव कोकाटे यांचे रमी खेळतानाचे दृश्ये व्हायरल झाले होते. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बोलता येत नव्हते, त्यांचे त..प..प.. होत होते. मोबाईल नंबर काय सांगितला, बोलत असताना त्यांना काही सूचत नव्हते. शेतकर्‍यांची कळवळ आहे, अशी पत्रकार परिषद सुरू केली. पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हती.


यानंतर त्यांनी त्यांच्यावर केस करेल, असे म्हणत मी दुसरे काही तरी करत होतो. त्यात तो व्हिडिओ आला असे सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना संवेदनशील कृषीमंत्री हवे आहेत. त्यांच्यावर कृपा करा आणि तुमचा राजीनामा द्या. ओसाड गावच्या पाटलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.


“ माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी काही जणांनी लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्यासमोर पत्त्याचे कॅट टाकले तेव्हा सुरज चव्हाणाकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर अतिशय गंभीर असे 8 सेक्शन लागले आहेत. गंभीर सेक्शन लागले असताना त्यांना अजून अटक झालेली नाही. सुरज चव्हाण यांनी केवळ संघटनात्मक पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.


राजीनामे सोडा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यांना सांगायचे आहे की महाराष्ट्र आता हे खपवून घेणार नाही” असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

अंजली दमानिया यांनी संजय शिरसाठ यांच्यावर त्यांच्या विभागातील अनियमिततांवर कोणतीही कारवाईन केल्याबद्दल टीका केली. तसेच संजय गायकवाड यांच्या मारामारी प्रकरणावरही त्यांनी फक्त तक्रार दाखल झाल्याबद्दल आक्षेप घेतला.


योगेश कदम यांच्या ‘सावली’ डान्स बार प्रकरणाचा उल्लेख करत, त्यांनी कारवाईची मागणी केली असतानाही ती झाली नसल्याचे सांगितले. बीडमधील एका डान्स बारवरील कवारवाईसाठी पाठपुरवा करूनही काहीच झाले नाही” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इतके सर्व होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


तसेच राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मी 6 दिवस मुंबईत नव्हते. मी मलेशियात होती . परंतु मी 2 लोकांशी बोलून याबद्दलची माहिती मागवली आहे. लवकरच याबद्दलचा सर्व तपशील उपलब्ध होईल” असे अंजली दमानिया म्हणाल्या.

 
 
 

Comments


bottom of page