राज्यातील 12 बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यामिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे 2026 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सबंधीत निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवारी सकाळी 11:00 वाजता राज्य मडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होत असून सकाळी 11:00 बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये , राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाल आणि एकून विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाल जाहीर होईल. त्यानंतर दुपारी 1:00 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकाव्या लागतील तर परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना ती भाषांच्या अटीतून सूट असेल, त्यासोबतच मंडळाने पुढील वर्षीपासून गणित आणि विज्ञानासाठी नेहमीच्या ऐंशी गुणांच्या परीक्षा व्यतिरिक्त आणखी एक पर्याय दिला आहे. ही परीक्षा 25 गुणांची असून त्यात संबंधित विषयाची आकलन क्षमता कसोशीने तपासली जाणार आहे. यातील गुण एकूण गुन्ह्यांमध्ये समाविष्ट न करता त्याची गुणपत्रिकेवर वेगळी नोंद करण्यात येईल, अशी देखील माहिती आहे.



Comments