राळेगावातील बेपत्ता 34 मुलींबाबत आदिवासी नाही तर हिंदूचा विषय - आदिवासी मंत्री अशोक उइके
- Navnath Yewale
- 5 days ago
- 2 min read

यवतमाळच्या राळेगाव इथल्या 34 बेपत्ता मुलींविषयी आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी मोठा खुलासा केला आहे. हा विषय हिंदू समाजाबाबत घडला आहे. अदिवासी विषय घेणं योग्य नाही, असं मंत्री उइके म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनीया प्रकरणात लव जिहाद अन् धर्मांतराची शंका व्यक्त करत पोलिसांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात पहिल्यापासून ज्यावर संशय व्यक्त केला जात आहे, तो मजहर कुरेशी याच्यासह 15 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आदिवासी मंत्री उइके म्हणाले की, हे प्रकरण समोर येताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी देखील युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पहिल्यापासून ज्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता, त्या मजहर कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यामध्ये वालविवाह कायद्यांतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला आहे. मजहर कुरेशी याच्याबरोबर 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत काय निष्कर्ष बाहेर येतो, त्यानंतर पुढची कारवाई ठरवण्यात येईल, असंही मंत्री उइके म्हणाले.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे, याची देखील माहिती घेतली आहे. पोलिसांची योग्य दिशेनं कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून पुढील पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होईल. पोलिसांकडून कोणतेही अँगल तपास सुटणार नाही. अशा सूचना दिल्याचेही मंत्री अशोक उइके यांनी सांगितले.
हे प्रकरण खूप गंभीर आहे, हिंदू समाजाच्या मुलींबाबत, असा प्रकार घडलेला आहे. बाललैंगिक शोषणाचा देखील प्रकार यात घडलेला आहे. आदिवासींच्या मुलींचा विषय घेणं, तो काही योग्य वाटत नाही. हिंदू समाजाबाबत जे काही घडत आहे. कमी वयाच्या मुलींबाबत प्रकार घडत आहेत. त्यावर पोलिस लक्ष ठेवून तपास करत असल्याचंही यावेळी उइके म्हणाले.
दरम्यान, राळेगाव आदिवासी समाजाच्या 34 मुली बेपत्ता प्रकरणात संशयित मजहर कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयित अरोपी पुरुष महिला, असे एकूण पाच जणांकडे कसून चौकशी सुरु आहे. मजहर कुरेशीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपी कुरेशी यानं केलेल्या अतिक्रमणावर राळेगाव नगरपालिकेने बुलडोझर कारवाई देखील केली आहे.



Comments