top of page

राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा, आता नॉटरिचेबल! विधान परिषद निवडणुकीवरुन नाराज असल्याची चर्चा; पक्षाच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

मुंबई : नुकत्याच विधान परिषद निवडणुक पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातून विधान परिषदेसाठी अनेकजण उत्सुक होते. महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला एक विधान परिषदेची जागा आली होती. योवळी पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली. मात्र त्यानंतर आता विधान परिषदेवर संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीमधील काही नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राजकीय वर्तुळातून मोठी उलथापालथ समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी पक्षातील आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. मला पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदार्‍या मी पार पाडल्या आहेत, असं राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे म्हणाले. विधान परिषद न मिळाल्याने आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.


राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आनंद परांजपे हे आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे, परंतु ते नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे अजून तरी स्पष्ट नाही.


राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यावर म्हणाले की, सकाळी बोलताना ते व्यवस्थित वाटले. परंतु आता त्यांचा आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन बंद आहे. हे असं आहे की, ते 2012 मध्ये विद्यमान खासदार होते. पवार साहेबांनी त्यांना शब्द दिला होता राज्यसभा देऊ, पण 12 वर्षे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे ते नाराज होते, महामंडळाचे उपाध्यक्षपद त्यांना द्यायचे ठरले होते. पुनर्वसन व्हाव अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मी सांगितलं होतं दोन महिने शांत राहा. आमची राम रहीमची जोडी आहे. माझा संपर्क झाला की मी त्यांच्याशी बोलेन, मी सर्वांना सांगणार आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारू नये असंही नजीब मुल्ला म्हणाले.

Comments


bottom of page