top of page

विधानपरिषदेवर बिनविरोध निवडूण आलेल्या दहा आमदारांनी घेतली शपथ

May 14
1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्शिक निवडणुकीत 9 आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 1 अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्वाचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून आमदारकीची शपथ घेतली.


विधान परिषदेच्या एकून 10 जागांसाठी ही निवडणुक प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये 9 जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली होती. 12 मे 2026 रोजी मतदान होणार होते. मात्र 10 जागांसाठी केवळ 10 उमेदवारांचेच अर्ज आल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा आल्या तर शिंदे गटाने 2 आणि अजित पवार गट व ठाकरे गटाला प्रत्येकी ए1 जागा मिळाली आहे.


पक्षनिहाय शपथ घेणारे सदस्य: भातीय जनता पार्टी : प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)

शिवसेना एकनाथ शिंदे गट: डॉ. निलम गोर्‍हे आणि बच्चू कडू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: अंबादास दानवे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट : झिशान सिद्दीकी

Comments


bottom of page