top of page

लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमरदाराचा इशारा

मनेाज जरांगे यांच्यावर गलिच्छ आरोप आम्ही सहन करणार नाहीत



मराठा आंदोलक मनोज जरांगे ह लढाऊ आणि प्रमाणीक नेतृत्व मराठा समाजास मिळालं आहे.मुंबई आंदोलनाच्या माध्यमातून ही लढाई अंतिम टप्यात आल्याचे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके जर जरांगे पाटील यांच्यावर गलिच्छ आरोप करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी (अ.प.) पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.


राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सोळंके याच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरेाप केले होते. हाके यांच्या आरोपांना उत्तर देताना आमदार सोळंके म्हणाले की. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढाऊ आणि प्रमाणीक नेतृत्व आहे. आज माझ्या विषयी वर्तमाणपत्रामध्ये जे काही ओबीसी नेते ते स्वत: समजतात ओबीसी नेते असे लक्ष्मण हाके यांनी आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटलांना दहा लक्ष रुपये दिलेत असा आरोप केलेला आहे मला या निमित्ताने लक्ष्मण हाके यांना एवढंच सांगायचं आहे. मराठा समाज हा अत्यंत स्वाभीमानी समात आहे. आणि हा लढा मुंबईच्या आंदोलनाच निमीत्तानं अंतिम टप्यामध्ये आलाय असं आम्ही मानतो.


जरांगे पाटलांनी सुद्धा वेळोवेळी जाहिर केलेलं आहे की आरक्षण घेऊनच आम्ही परत येणार आणि त्यामुळं या मतदासंघाचा आमदार या नात्याने या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार आहे. आमचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आज पर्यंत या आंदेालनासाठी कुठल्याही कार्यकर्त्याने जनेतेने आर्थिक मदत मागीतलेली नाही. हा काय राजकिय विषय नाही हा समाजिम विषय आहे आणि कुणी मतद मागीतली तर आम्ही निश्चित आम्ही देऊ. स्वयंस्पुर्तीने लोकं या आदोलनामध्ये आहेत. आणि जरांगे पाटील हे अतिषय लढाउ आणि प्रमाणिक नेतृत्व आहे. आणि म्हणूनच मराठा समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. ते कुठेच या लढ्यामध्ये कुणाशी कॉम्प्रमाईस करणार नाहीत.


शासनाशी तर करणारच नाहीत कुठल्याही प्रलोभनाला ते बळी पडू शकत नाहीत. आणि स्वत: च्या जीव धोक्यात घालून त्यांनी हे आंदोलन पुढे नेलेलं आहे. त्यामुळं असे पैशाचे आरोप करणं म्हणजेच मुर्खपणाचा कळस आहे. त्यांची लक्ष्मण हाके यांनी निश्चितच ओबीसींच आंदोलन करावं यात्रा काढावी. परंतु आमच्या नेतृत्वावर अशाप्रकारचे गलिच्छ आरोप जर लक्ष्मण हाके यांनी केले तर ते आम्ही सहन करणार नाहीत. त्याचा मुहतोड जवाब आम्ही देऊ. मी पाठीमागच आंदोलनाला पाठिंबा जाहिर केलेला आहे. माझ्या फेसबुकवरून जाहिर केलेला आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना माझ्या विनंती केलेली आहे की आपण सर्वांनीच एकजुटीने या आंदोलनामध्ये सहभागी होवून 29 तारखेला मुंबईला पोहचायचं आहे.



मी सर्व मराठा समाज बांधवांना आणि इतरही समाज बांधवांना विनंती करतो की हा जे गोरगरिब मराठे आहेत गरजवंत मराठे आहेत त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना नोकर्‍या मिळाव्यात म्हणून ही आरक्षणाची मागणी आहे. आणि त्यामुळं सर्व समाज बांधवांनी जसं आजपर्यंत गावाच्या गावगाड्यामध्य मराठा समाजाबरोबर सर्व समाज राहिलेले आहेत. त्या पद्धतीने या आंदोलनामध्ये आठरापगड जातिच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि गरजवंत मराठ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं अवाहन आहे.


मराठा समाजा स्वाभीमानी

लक्ष्मण हाके यांच्या आरोपाचे खंडन करताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की मनोज दादा यांना दहा लक्ष रुपयेच काय आम्ही अवश्यक मदत करायला तयार आहोत. पण मागायला कोणीच येत नाही. मराठा समाजा स्वाभीमानी आहे. ते अद्यापर्यंत मदत मागायला कोणीच आलेलं नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या वर आरोप करणं म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. मी मदत द्यालया तयार आहे पण मागायला कोणी येत नाही.

Comments


bottom of page