top of page

लायकी-लाज व्हाया पार्श्वभाग- वायझेडलक्ष्मण हाके - आमदार अमोल मिटकरी यांच्यातील कलगीतुरा




ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या वीस वर्षापासून अर्थखात्याच्या खुर्चीला चिटलेत, काकाच्या पुन्याईवर राजकारणात, अजित पवार यांनी काय अर्थशास्त्राची पीएचडी केली आहे का्र? ओबींसीसाठी काहीच करू शकला नाही अशा विविध प्रश्नांचा भडीमार करत अगदी एकेरी भाषेच्या उल्लेखाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष नेते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. लक्ष्मण हाके यांनी पंढरपूर, बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार मिटकरी यांची लायकी, लाज काढत इशारा दिला त्याला आता आमदार मिटकरी यंच्याकडून प्रत्यूत्तरादाखल पार्श्वभाग, वायझेड ची उपाधी देत प्रतित्यूर दिले आहे. या दोन्ही नेत्यांचे वाकयुद्ध माध्यमप्रतिनिधींसह सोशल मिडियावर नेटकर्‍यांना भावल्याचं चित्र आहे. सोशल मिडियावर कमेंटच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांवर टिका, टिप्पनी सल्ले दिले जात आहेत.


राष्ट्रमाता, राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशतकोत्तर जयंती दिनी लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून अजित पवार यांच्यावर निशाना साधात वीस वर्षापासून अजित पवार अर्थखात्याच्या खुर्चीला चिटकून आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे का? अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमातींसह मागासवर्गीयासांठी अजित पवार यांनी काय केलं त्याचं उत्तर मागत अमोल मिटकरी यांच्यावर एकरे भाषेत टिका करत त्यांची लाज आणि लायकी काढली होती. त्यावर अमोल मिटकरी यांनी सोशल मिडीयाच्या फेसबूक प्लॅटफॉर्मवरू लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टिका करत स्वयंघोषीत ओबीसी नेता म्हणवणार्‍या हाक्याला वेळीच सल्ला आमचं उनदून काढून नकोस तु गाडी कसी घेतली आणि ती समाजावर कशील लादली, हा पक्का वायझेड असल्याचे सांगत एकेरी भाषेत टिका केली.


त्यानंतर भिमराज सेनेच्या वतिने संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी, मागासवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात काय तरतुद केली याचे उत्तर ओबीसी भटक्या, अनुसूचित जाती जमाती या घटक कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात 43 टक्के वाढ करून 22 हजार 658 कोटींची तरतुद, अनुसूचीत जमाती घटक कार्यक्रमांसाठी 22 हजार 495 कोटींची तरतुद केली तर धनगर समाजाला आदिवासी उपाय योजनांच्या धर्तीवर 22 योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषीत केल्या. या शिवाय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मोत्सवा निमित्त चौंडी या जन्मस्थळी 450 कोटींचा विकास आराखडा या सरकराने घोषीत केला.


एवढच नाही तर सामाजीकन्याय, आदिवासी विभाग असेल या सगळ्या बाबींसाठी निधींची तरतुद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सुरू आहे. एवढी साधी अक्कल हाक्याला नसेल, आम्हाला शिव्या सराप देऊ नको, “तु गाडी घे, घोडी घे, दारु पी नाहीत आणखी काही पी” तु काही प्रश्नांची उत्तरं दे भोकर विधानसभेसाठी प्रहार पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार का घेतली. तु दबाव आणुन का माघार घ्यायला लावली, तु कोणाशी तोडपाणी केली. इतकच नाही तर मागास आयोगाच पद कसं बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलंस. एवढच सांग ओबीसीचा गैरफायदा घेऊन ज्या ठिकाणी ओबीसीचे उमेदवार उभे केले, ते आज कोणत्या ठिकाणी आहेत हक्याने आम्हाला सांगावं. आम्हाला खालच्या पातळीवर बोलत असताना स्वत: आत्मचिंतन करावं भिमराज सेनेचा मी ही एक सदस्य आहे. जशास तसं उत्तर देण्याची आमची ताकद आहे.


हाकेने आता माफी मागावी नाही मागीतली तर आता इथून पुढं त्याची गाठ सामाजीक संघटनेशी असणार आहे. जिथल्या तिथं, जशास तसे उत्तर दिलं जाईल. ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये आमचा वाय शर्ट काढूनको, आम्ही जर तुझ्या पार्श्वभागावर हानलं तर जिन्स पॅन्टच्यावरून सुद्धा वायझेड दिेसेल. औकात विसरला तर आम्ही सज्ज आहोत असा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला.


दरम्यान, मागील आठवड्यात लक्ष्मण हाके यांना परभणी जिल्ह्यातील सोनी सावरगाव येथील ओबीसी बांधवांनी फॉरच्यूनर भेट दिली. त्यानंतर हाके यांनी अजित पवार यांच्यावर एकेरी शब्दात टिका केल्यानंतर या दोन्ही नेत्यामध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. शिवाय भोकर विधानसभेच्या निवडणूकीसाठी प्रहार पक्षाकडून उमेदवार देण्यात आला होता. त्याने ऐनवेळी मागार घेतल्याबाबत प्रहारचे भोकर तालुकाध्यक्ष आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संवादाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोप प्रत्यारोपांनी शिवराळ भाषेची परिसीमा गाठली असून सुरवातीला लाज, लायकीचे वाकयुद्ध व्हाया पार्श्वभाग, वायझेड पर्यंतचे येवून ठेपल आहे.

Comments


bottom of page