top of page

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; 12 मे रोजी मतदान

Apr 16
1 min read

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत अयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्चया 9 जागांसाठी 12 मे रोजी सकाळी 9 :00 वाजल्यापासून दुपारी 4:00 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या निवडणूक प्रोगामनुसार निवडणूक अधिसूचना जारी करणे: 23 एप्रील 2026, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 30 एप्रिल 2026, उमेदवारी अर्जांची छाननी : 2 मे 2026, उमेदवारी अर्ज मागे घण्याची अंतिम तारीख : 4 मे 2026, मतदानाची तारीख 12 मे 2026 , मतदानाची वेळ: सकाळी 9:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत


13 मे रोजी संपतोय विधानपरिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ: विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2 राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीकउे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी एमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असणार आहे.


विधानपरिषदेच्या या सदस्यांचा कार्यकाळ संपणार : उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना -उबाठा), निलम गोर्‍हे (शिवसेना शिंदे), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी- शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी-अजित पवार गट), गोपिचंद पडळकर (भाजप), राणजितसिंह मोहिते पाटील (भाजप), राजेश राठोड ( काँग्रेस), प्रविण दटके (भाजप), रमेश कराड (भाजप) यांचा समावेश आहे.


दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडूण येण्यासाठी 28 मतांचा कोटा अवश्यक आहे. महायुतीत भाजप (131आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार), राष्ट्रवादी अजित पवार गट (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडूण येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे, त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडूण येऊ शकतो. दुसयर्‍या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवा जुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

Comments


bottom of page