top of page

वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवणार?

वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती, प्रॉपर्टी सील च्या अर्जावर पुढील सुनावणी 22 जूलैला

ree

मस्साजोगचे सरंपच स्व. सरपंच देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यास बीडच्या कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज सुनावणी नंतर अ‍ॅड. उज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबतच निर्णय कारागृह प्रशासनाचा असल्याचे सांगितले.


बीड कारागृहात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाल्मिक कराडला नाशिकला हलवण्याची योजना असल्याचं बोललं जात आहे. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती आणि प्रॉपर्टी सील च्या आर्जावर कोर्टात सुनावणी पार पडली. त्यानंतर अ‍ॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयाच्या आवारात मध्यमांशी संवाद साधला. अ‍ॅड. उज्वल निकम म्हणाले की, वाल्मिक कराडला नाशिक कारागृहत हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. तुरुंग प्रशासनच याबाबत निर्णय घेइल. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही.


न्यायालयानेही याबाबत आमच्याकडे विचारणा केलेली नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात आहे. वाल्मिक कराडला कुठल्या तुरुंगात ठेवणं हे अधिक सुरक्षित राहिल, याबाबत मला माहिती नाही असही ते म्हणाले.

वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती करण्या बाबतच्या अर्जावर आज कोर्टात युक्तिवाद झाला. आजच्या सुनावणीला अ‍ॅड. उज्वल निकम उपस्थित होते. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 जूलै रोजी होणार आहे. वाल्मिक कराडला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर 22 तारखेलाच सुनावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली.


दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी वाल्मिक कराड यांचे बँक खाते सील करण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी न्यायालयात केली आहे. तसेच प्रॉपर्टी जप्तीसाठी केलेल्या अर्जावर देखील येत्या 22 जूलैला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सुनावणी वेळी न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहेत.

Comments


bottom of page