top of page

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना बीड कोर्टाचा दणका संतोष देशमुहत्या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित


बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो दाखवत ह्रद्य पिळवटून टाकणारी माहिती दिली. आरोपीच्या क्रूर माणसीकेते विरोधात राज्यात संतापाची लाट उसळल्याने न्यायासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं करण्यात आली.


यामध्ये खासदार बजरंग सोणवने, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रोश मांडला. देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी राज्यभरातील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला. यादरम्यान बीडमधील विविध मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या आणि अवादा कंपनीकडून खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निवटवर्तीय वाल्मिक कराडचे नांव आले, त्यातच धनंजय मंडे यांच्यावर कृषी विभागातील कथित गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.



संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालय परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अ‍ॅड. बाळासाहेेब कोल्ले उपस्थित होते. सर्व आरोपींना व्हीसी द्वारे हजर करण्यात आले होते. आरोपींचे वकील यावेळी उपस्थित होते. सुनावणीदरम्यान आरोपींवरील ड्राप्ट कोर्टाने वाचून दाखवला.

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 8 जानेवरीला होणार आहे.


सुनावणीनंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला, अ‍ॅड. निकम म्हणाले की, अखेर न्यायालाने आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. आजही अरोपीच्या वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फॉर डीरेल केले. खटल्यात विलंब लावणे व खटला उलथवून टकाण्याचा प्रयत्न आहे.


प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच ती कारणे न्यायालयात मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिले. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो किंवा कोणत्याही कोर्टात असो प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले.

Comments


bottom of page