top of page

विजय घाडगे यांनी घेतली अजित पवारांची भेट

परतीच्या प्रवासात प्रकृती बिघडली; रुग्णवाहिकेतच उपचार



छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे लातूर येथील रुग्णालयातून थेट अजित पवारांच्या भेटीसाठी निघाले होते. काल त्यांना लातूरमध्ये पोलिसांनी उपचाराची अट घातली होती. त्यानंतर आज विजय घाडगे यांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करत पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली.


पुण्यात अजित पवारांच्या भेटीनंर विजय घाडगे लातूर कडे परतत असताना रस्त्यातच अचानक त्यांची तब्येत बिघडली. अ‍ॅम्बुलन्समधून ते पुण्याहून लातूरकडे निघाले होते. तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर अ‍ॅम्बुलन्समध्येच उपचार सुरू करण्यात आले. सूरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. मारहाण प्रकरणानंतर आज (25 जूलै) घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरू असताना मोबाईलवार रमी खेळत असल्याचा दावा रोति पवार यांनी केला होता. यावरून विरोधकांनी कृषीमंत्री आणि राज्य सरकारवर निशाना साधला होता. या प्रकरणावरुन कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.


रमी प्रकरणादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्ररदेशाध्यक्ष सनील तटकरे लातूर दौर्‍यावर होते. कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी छावा संघटनेद्वारे करण्यात आली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या समोर पत्ते उधळले. यादरम्यान राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी छावाच्या विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर पक्षातून कारवाई करण्यात आली.


मारहाण प्रकरणानंतर विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात भेट घेतली. मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यासंबंधित निर्णय घेतला जाईल अशा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विजय घाडगे म्हणाले. सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याची माहितीही घाडगे यांनी दिली. भेटीनंतर लातूरला जाताना त्यांची प्रकृती बिघडली. प्रकृती अधिक बिघडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टर म्हणाले आहेत.

Comments


bottom of page