top of page

विधानभवनाच पावित्र भंग ! ; लॉबीतच आव्हाड, पडळकर समर्थकांमधे हाणामारी

विधानभवन परिसरातच आमदार सुरक्षीत नाहीत आव्हाडांचा संताप


राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातील मुद्दयाची लढाई आता गुद्दयावर आली आहे.दुपारच्या सत्रात आमदार आव्हाड विधानभवनाच्या पायर्‍यावर असताना आमदार पडळकर यांचे समर्थकांनी आव्हाडांच्या समर्थकांना भिडले. दोन्ही समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लॉबीतच दोन्ही आमदारांच्या समर्थकामध्ये राडा झाल्याने विधानभवनाचे पावित्र भंग झाल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत.


आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनामध्ये माध्यमांसमोर मंगळसूत्र चोरच्या घोषणा दिल्या होत्या. गोपिचंद पडळकर यांनी काल विधानभवन परिसरातच आमदार आव्हाड यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडओ व्हायरल झाला होता. आज विधीमंडळ आधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या आधिवेशन सत्रामध्ये आमदार आव्हाड यांनी पडळकर यांनी वयोवृद्ध महिलेची फसवणूक करत जमिन लाटल्याचा आरोप केला. वृद्ध महिलेची उतारवायात फसवणूक करत तिची जमिन लाटल्या प्रकरणी आमदार आव्हाड यांनी सभागृहात चौकशीची केली. याशिवाय काल घडलेल्या प्रकारबद्दल ट्विट केलं असता धमकीचे फोन येत आहेत, जिवे मारण्याच्या कमेंट आहेत. फोन नंबर आहेत. नेहमी सांगण्यात येतं फिर्याद द्या आता पाहू पोलिस काय करतात. अशा भावना त्यांनी सभागृहात व्यक्त केल्या. दुपारच्या सत्रानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिनाथ पडळकर यांचे समर्थक समोरा समोर भिडले. दरम्यान दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, गुंडांना विधानभवना पर्यंत केवळ मला मारण्यासाठी आणलं गेलं होतं. असा आरोप आमदा आव्हाडांनी केला.


दरम्यान, माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, विधानभवनाच्या पायर्‍यावर आमदार सुरक्षीत नसतील तर आमदार कशाला रहायचं, आई, बहिणीवंर शिव्या घातल्या जातात, असंविधानीक भाषेचा वापर केला जातो, त्यांच्या शब्दांना संविधानीक भाषा म्हणून घोषीत करा. विधीमंडळात जर गुंडांना प्रवेश दिला जात असेल तर कशाला रहायचं आमदार असा संतापही त्यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.


... तरच तुम्ही राज्याचे पालक- उद्धव ठाकरे :

विधानभवनासह हा परिसर एक मंदिर आहे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करणारे स्वत: गुंड म्हणवून घेतात. तर त्यांना विधानभवन परिसरात येण्यासाठी पास कोणी दिले. विधानभवन परिसरात गुंडांना प्रवेश मिळत असेल तर या राज्याचा अर्थ काय? गुंड म्हणवून घेत असाल तर मैदानात या, या गुंडाना पास देणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली, तरच तुम्ही या राज्याचे पालक आणि मुख्यमंत्री. अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

Comments


bottom of page