विरोधीपक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीची थेट सरन्यायाधीशांकडे धाव
- Navnath Yewale
- Jul 8
- 2 min read

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार सथापन होऊन जवळपास सात महिने उलटूनही राज्याला विरोधी पक्षनेता नाही, ही गोष्ट संसदीय राजकारणाला आणि संविधानलाही धरून नाही. असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच राजकीय आकसापोटी विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्ती होत नसल्याची तक्रार आम्ही सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे करू, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेतील इशार्यांवर खरोखर विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेतेपदासाठी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे धाव घेत मागण्यांचे पत्र दिले.
आज राज्य विधीमंडळाच्या वतिने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधानमंडळच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. निलम गोरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सीागृहाचे सदस्य उपस्थित होते. सत्कार समारंभ आटोपल्यानंतर आमदारांनी सरन्यायाधीशांसोबत हस्तांदोलन करण्यासाठी रांग लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती होत नसल्याच्या तक्रारीचे पत्र सरन्यायाधीश गवई यांना दिले.
फडणवीस सरकार येऊन 7 महिने उलटले तरी विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर अजूनही निर्णय घेत नाहीत.
संख्याबळाच्या अडचणीमुळे विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या प्रस्तवावर निर्णय नसल्याचे सांगण्यात आले. पंरतु विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी अमुक टक्के संख्याबळ हवे, अशी कोणतीही तरतुद कायद्यात नसल्याचे महाविकास आघाडीने निदर्शनास आणून दिल्यानंतर योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे अध्यक्षांकडून सांगण्यात आले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे . किमान चालू सलेल्या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा विरोधी पक्षाला होती. मात्र, त्यादृष्टीने सरकारची पावले पड नसल्याचे सरन्यायाधीशांच्या दौर्याच्या निमित्ताने थेट त्यांच्याकडेच तक्रार करून त्यांचे लक्ष या मुद्याकडे वेधण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला.
सरन्यायाधीश यांना भेटून दिले पत्र
मंगळवारी दुपारी साडे तीन च्या सुमारास विरोधी पक्षातर्फे जितेंद्र आव्हाड हे सरन्यायाधीश गवई यांना भेटले. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी गवई यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी राज्यात विरोधी पक्षनेतपदाची नियुक्ती होत नसल्याच्या तक्रारीचे पत्र सरन्यायाधीश गवई यांना दिले. राज्यात सरकारी पक्षाकडून घटनेचे पालन होत नसल्याची तक्रार आव्हाड यांनी थेट सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातून केली. आव्हाड यांच्यासोबत काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते.



Comments