top of page

वैर माझ्याशी होतं माझ्या मातीची बदनामी का? - धनंजय मुंडे बीडमध्ये तुम्ही घाण केली, सहा महिने गप्प अन डोळ्यावर चष्मा कारण.. करुणा शर्मा- मुंडे यांचा घणाघात

ree

बर्‍याच दिवसांनी मी बोलतोय, न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता काढले आहेत. या दिवसात जे काही घडलं त्यात मला एक गोष्ट जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी माझ्याशी वैर होतं तर माझ्या मातीची बदनामी का? असा सवाल करत धनंजय मुंडेनी विरोधकांना उत्तर दिलं. ते आज बीडे येथे आयोजीत निर्धार मेळाव्यात बोलत होते.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडेवर आरोप केले जात होते. या आरोपांवरून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा ही द्यावा लागला. वाल्मीक कराडचे त्याच्यांशी असलेल्या संबधामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणाला तब्बल 200 दिवस झालेत.. या 200 दिवसानंतर त्यांनी आपल्या विरोधकांना उत्तर दिलं.

आज 200 दिवसांनी बोलतोय, येथे बोलावं की मैदानात, हा प्रश्न माझ्या मनात होता.


म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून येथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते माहित आहे. आजपर्यंत ते करत आलोय हेदेखील आपल्याला माहितीये. बीडचा आगळावेगळा इतिहास आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आज आलेत. आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याबाबत असणारी अपेक्षा नक्की पूर्ण करू असं वचन आपण तटकरे साहेबांना देऊ, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.


ज्यांनी बाहेरुन येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्त , एक जिल्हा , एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्याविषयी आपण चार ओळी म्हणणार आहोत. ‘ तुम्हारी सोच के सांचे में ढल नही सकाता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, असे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नही सकता, अशी शायरी धनंजय मुंडे यांनी विरोधकांना आपण पराजित झालो नाही. खचलो नाही असं ठणकावून सांगितलं.


माझ्या मातीची बदनामी का?

न बोलण्याची सेंच्युरी माझी झालीय, जवळपास 200 दिवस न बोलता काढलेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या गोष्टी झाल्या. त्यापैकी एक गोष्ट मला जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली मग ते बीडच्या मातीतला असेल, किंवा बीडच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढं सांगायचं वैर माझ्याशी होतं तर माझ्या मातीची बदनामी का? असा सवालही त्यांनी केला.


काय म्हणाल्या करूना शर्मा- मुंडे


आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केली, भलेही तो बडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सागायंच वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल धनंजय मुंडेनी विरोधकांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या निर्धार मेळव्यात ते बोलत होते. यावरूनच करुणा शर्मा-मुंडे योनी धनंजय मुंडेवर निशाना साधला आहे.

धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता.


डोळ्यावर चष्मा घातला होता. कारण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीत. जी तुम्ही घाण केली त्याची उत्तर तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही गप्प होतात. जनतेच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची लायकी नाही, असं म्हणत करूणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, मुंडे म्हणताय जिल्ह्याची बदनामी करू नका, तर जिल्ह्याची बदनामी तुमच्यामुळेच झाली आहे. तुमच्या कारनाम्यामुळे झाली आहे. असं करूना शर्मा- मुंडे म्हणाल्या.



Comments


bottom of page