top of page

(व्हिडिओ)...इथे मृत्यूलाही संकटाने गाठले , अन् पुराच्या पाण्यात अश्रूच आटले...



ree

नांदेड: मागील दोन दिवसापासून ढगफुटीसद़ृश्य मुसळधार पासाने हाहाकार माजवला आहे. लेंडी, मांजरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लेंडी नदीलाच्या पुरोन पुनर्वशीत गावांना वेढा दिल्याने शेकडो नागरीक आडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुक्रमाबाद येथील शेकडो जनारांचा मृत्यू झाला आहे.


तारदवाडी (ता.मुखेड) येथे जीव धोक्यात घालून अंत्ययात्रेलाच पुराच्या पाण्यातून दोरीचा आधार घेत मार्ग काढवा लागल्याचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

गोदावरीच्या पुरामुळे विष्णूपुरी प्रकल्पाचे प्रथम चार तर सायंकाळी पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आल्याने जुन्या नांदेड शहरातील घरे पाण्याखाली गेली आहेत.



मुखेड तालुक्यात लेंडी व मांजरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो गावांना पुराचा वेढा बसला आहे. लेंडी प्रकल्पामुळे पुनर्वसीत रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हसनाळा गावाला पुराचा वेढा बसला आहे. यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यत येत आहे.


प्रशासनकडून एसडीआरएफ चे जवानांकडून मतदकार्य सुरू आहे. बहुतांश नागरीकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सतत कोसळणार्‍या पावसासह पुराच्या वाढत्या प्रवाहामुळे मतदकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

तारदवाडी येथे स्मशानभूमिकडे जाणार्‍या नाल्याला पुर आल्याने अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून दोन्ही बाजून झाडाला दोरी बांधून अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून काढावी लागली. दरम्यान,आभाळा एवढं दु:ख झेलत जीव धोक्यात घालून संकाटा डोंगर सर करत पुराच्या पाण्यातून दोन्ही बाजूने बांधलेल्या दोरीचा आधार घेत अंत्ययात्रींनी स्मशानभूमिचा मार्ग काढला. मुसळधार पावसामुळे गावाला पुराचा वेढा, त्यातच अंत्ययात्रेला उशीर होत असल्याने नागरिकांनी विधीवत मृतदेहाची तिरडी खांद्यावर असतना पुराच्या पाण्यातून मार्ग काढल्याचा तारदवाडी येथील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Comentarios


bottom of page