top of page

शौर्य दिनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अनुयायांकडून अभिवादन


पुणे: शौर्यदिनाच्या निमित्ताने आज 1 जानेवारी 2026 रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांचा जनसागर लोटाला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच वियजस्तंभ परिसर घोषणांनी दणाणून गेला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन 500 शूरवीरांना मानवंदना दिली.

विजयस्तंभाजवळ उपस्थितांना संबोधित करताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या लढ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “ भीमा कोरेगावचा इतिहास हा देशातील मानवतेचा इतिहास आहे. ही लढाई तत्कालीन जाती व्यवस्थेविरुद्धचा एक मोठा संघर्ष होता. हा लढा जिंकला गेला आणि तिथूनच एका ‘नव्या भारताच्या ’ पर्वाची खर्‍या आर्थाने सुरुवात झाली.” या विजयानंतर भारतात ब्रिटीश सत्ता प्रस्थापित झाली असली, तरी त्यासोबतच एका नवीन विचारसरणीचा उदय झाला, ज्याने आधुनिक भारताच्या उभारणीचा पाया घातला. हा लढा केवळ लष्करी विजय नसून तो आत्मसन्मान आणि सामाजिक समतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.


या सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि लाखो भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने विजयस्तंभाला अभिवादन केले.


गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा (रुग्णवाहिका) आणि फिरती शौच्यालये यांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यासोबत अनुयायांची गैरसोय दूर करण्यासाठी वाहतूकीचे नियोजनही करण्यात आले होते.

Comments


bottom of page