शिवसेने (उबाठा) च्या बड्या नेत्यांचा लेटर बाँम्ब; दानवे, राऊतांवर आरोप, ठाकरेंची साथ सोडली
- Navnath Yewale
- Jun 22
- 1 min read

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि मनसे एकत्र येणार याची चर्चा जोर धरत असतानाच, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनला गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी करताच अवघ्या काही दिवसांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. तर अनेक नेते पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. अशातच शिवसेने (उबाठा) च्या बड्या नेत्याने एका जाहिर पत्राद्वारे ठाकरेंच्या शिवसनेला गळती का लागली याची कारणमिमांस मांडली आहे.
जालन्यात ठाकरे गटाचे नेते डॉ. संजय लाखेपाटील यांनी शिवसेना सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी डॉ. लाखे यांनी एका खरमरीत पत्रातून उद्धव ठाकरे यांना पक्षातील वस्तुस्थिती कथन केली आहे. या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर, वस्तुनिष्ठ मांडली केेली आहे. दरम्यान, शिवसेनेतील (उबाठा) अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितले पक्ष प्रवेश करा. जालना लोकसभा सीट आपण सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ, असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेत प्रवेश केला. मी अनेकदा संजय राऊत यांना जालना सोडा असं सांगितलं. संजय राऊत हा आपला वेगळा अजेंडा चालवतात. सजय राऊत यांनी तडजोड केली. सांगली शिवसनेकडे ठेवली. सांगली मतदरासंघामध्ये शिवसेनेची एकही शाखा नाही. आणि पराभव अटह आहे. कमकुवत उमेदवार दिला. तरी त्यानंतर मला सचिव पदाची जाबाबदारी दिली. मी निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केले.
मला संघटनात्मक कामापासून वगळण्यात आलं. राज्य स्तरावर असेल किंवा जिल्हास्तरावर माला बोलावलं नाही. गेल्या आठ दहा दिवसात कार्यक्रम राबवण्यात आले तो आमचा आहे. आमचा कार्यक्रम दानवे यांनी अलगद उचलला. दानवे यांनी स्वत:चे नेतृत्व पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल. आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. अंबादास दानवे यांनी नियुक्ती यामध्ये स्वत: ची मनामानी केली असे अनेक आरोप डॉ. लाखे यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत पदाचा राजीनामा दिला आहे.



Comments