संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपीचे समर्थक सोशलमिडीयावर सक्रीय- धनंजय देशमुख
- Navnath Yewale
- Dec 14, 2025
- 2 min read

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला एक वर्षे लोटले. एकून आरोपी पैकी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीडच्या कारागृहामध्ये कैदेत आहेत. मात्र, आरोपींचे समर्थन करणारे सोसाल मिडीयावर सक्रिय असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आरोपींना फरार होण्यापासून रसद पुरवणार्यांवरही कारवाई नसल्याने आरोपींच्या समर्थकांची हिम्मत वाढत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिन अर्जावर शुक्रवारी (दि.12) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. आरोपीच्या वकीलाकडून दोन तीन तास युक्तीवाद करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड शेकडो किलोमिटर दूर होता. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकीलाकडून करण्यात आला.
सरकारी पक्षाकडून अॅड. गिरासे यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकून 23 व्हिडीओ मा. न्यायालयासमोर दाखवले. यामध्ये मा. न्यायालयाने पहिल्या क्रमांकाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुढील व्हिडीओ पाहण्याची मानसीकता नसल्याचे सांगत शेवटचा व्हिडीओ पाहिला. दरम्यान, न्यायालयात संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ पाहात असताना धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या पत्नी यांना अश्रू अनावर झाले आणि ते मा. न्यायालयीन कक्षाच्या बाहेर आहे. यावर आता (दि.16) रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडल्यानंतर मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रशासनावर गंभीर आरोप केले.
धनंजय देशमुख म्हणाले की, कोर्टात घटनाक्रमाचे 23 व्हिडीओ दाखवताना कोर्ट म्हणाले की ‘हे असे व्हिडीओ आम्हाला दाखवू नका हे पाहणं असाह्य आहे, ते आम्ही पाहू शकत नाहीत असं कोर्ट म्हटलं. त्यावर आम्ही ती कल्पना केली, आम्हाला अश्रू अनावर झाले आणि आम्ही कक्षातून बाहेर पडलो.
संतोष भैय्या खूप निर्घुण पणे हत्या केलेली आहे. हाच एक नंबरचा आरोपी सगळ घडवून आणत होता, त्याची कॉल रेकॉर्डींग, त्यचे टॉवर लोकेशन, त्याची ही चैन या सगळ्या गोष्टी सरकारी वकीलांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक प्रामुख्याची गोष्ट अशी आहे की, देशमुख कुटुंबीयांवर, गावावर एवढा आघात होवून देखील पहिल्या दिवसापासून अगदी विनंम्रपणे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे न्यायाच्या भुमिकेत एसआयटी, सीआयडी च्या अधिकार्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे.
पण गृहमंत्र्यांना, न्यायालयास चॅलेंज म्हणून, प्रशासनाला, एसआयटीला चॅलेंज म्हणून आरोपीचं समर्थन करणारे लोक इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप असेल त्यावर काही पोस्ट शेअर करता या आठदिवसामध्ये की, ‘एक नंबरचा आरोपी बाहेर येणार, त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार, परत अस तसं करू परत दहशत करू. तर खर्या आर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची घेवून आमचं कुटुंब भयभित आहे. त्याला थोडा आधार द्यावा आणि या सगळ्या लोकांवर कारवाई करावी आसं आमचं मत आहे आणि तसी आम्ही मागणी देखील लेखी स्वरूपात करणार आहोत असंही धनंजय देशमुख म्हणाले.



Comments