सरकारचा बाप आडवा आला, तरी आम्ही मुंबईला येणारच! ; मुख्यमंत्री फडणवीसांना मराठ्यांविषयी खुन्नस
- Navnath Yewale
- Aug 24, 2025
- 3 min read
मुंबईतील 29 ऑगस्टच्या नियोजीत आंदोनलाच्या पार्श्वभूमिवर आज मांजरसुंबा (जि.बीड) येथे आयोजीत इशारा बैठकीस संबोधीत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली.

बीड: मराठ्यांच्या आदोलना विरोधात षडयंत्र रचलं जातंय, आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत मुंबईला येत आहोत, एकाही आंदोलनकर्त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. न्यायाची भूमी म्हणून आम्ही मुंबईत न्याय मागायला येतोय, मुंबईकरांनी सहाकार्य करावं, आम्हीही तुमची सेवाच करणार आहेत.
उपस्थित समाजबांधवांना संबोधीत करताना जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून कोणी थांबू नका, सत्तेतल्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेका बाळांच फुकट शिक्षण होणार नाही. सत्ता असली म्हणजे काय फुकट नोकरी लागणार नाही. काही करा जात हारु देवू नका. चंद्र सुर्य असे पर्यंत जातीचं कल्याण होईल,प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळांना आरक्षणाची गरज आहे. लेकरा बाळांच्या शिव्या शाप खाऊ नका. ज्यांना राहायचं त्यांनी मुंबईला पंधरा दिवस चला. ज्यामध्ये आज 55 लाखांची नोंद तर सोडायला येणारांची दिड कोटींची नोंद झाली आहे.
प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी विचार करायची गरज आहे.मी आजपर्यंत समाजाची मान खाली होईल असं काम केलं नाही. आत्तापर्यंत तीन करोड मराठ्यांना आरक्षणात घातलं आहे. आमचंच आम्हाला मागतो, ते आम्ही मिळवणारच आहोत.
मराठा आरक्षण उपसमिती पूनर्गठणाच्या निर्णासाठी वर्षा बंगल्यावरील आयोजीत बैठकीला उद्देशून दक तात्या आणि दोन अप्पांची रात्रभर काथ्या कूट सुरू होती असा उपहसात्मक टोलाही जरांगे पाटील यांनी लगलावला. पोळ्याच्या दिवशी खांदा बदली करून मराठ्यांना वेड्यात काढायचं सोडून द्या मराठे खूप हुषार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस हे फार कुटील आहेत, मोठं घर सोडून तुमच्यात आलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सन्मान मिळत नाही. फडणवीसांनी जाती- जातीत माणंस ठेवले नाहीत. मराठ्यांच्या विरोधात ओबीसी तर ओबीसींवर मराठ्यांना घालण्याचा प्रयत्न केला. पण काहीच होऊ दिले नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आता द्यायचं वळवळ करायची नाही. आम्ही आरक्षण घेणारचं!.
दोन वर्षे वेळ दिला एवढ्या वेळेसच वेळ मागणतोय मराठ्यांना. एमबीबीएसला दोन तर नांदेडला एक कलेक्टर झालेत. दोन वर्षे थांबा मागील 70 वर्षाचा बॅकलॉक भरुन निघेल. आरक्षणा अभावी आपलं वाटोळं झालं, मराठ्यांचा राजकारणाच्या स्वार्थासाठी वापर करण्यात आला. मराठ्यांनी यापूढे सावध रहायचं.व्यसनापासून दूर रहा, एकानेही दारू प्यायची नाही. दारू मुक्तीच्या दिशेने वाटचाल करा.
माणसांना दारू पिऊ द्यायची नाही. त्यानीं षडयंत्र सुरू केलं आहे मुंबईत येऊ द्यायचं नाही, मुंबईत घुसायचं ते गणपती बप्पा घेऊनच घुसायचं. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही, मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो. समाज मोठा करायचा आहे. शांततेत पुरा देश बंद पडतो, तुम्ही नुसतं मुंबईत बसा. त्यांना काय करायचं ते करूद्या आपण भ्यायचं नाही मुंबईकडे निघायचं.
काय चूक केली मराठ्यांनी तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, आमचं हैदराबादचं गॅझेट आहे सरकारी नोंदी आहेत मराठ्यांनी जागे व्हा.
त्यावेळी गिरीष महाजनांनी त्यावेळेस म्हणाले होते मराठा-कुणबी एकच असल्याचा पुरावा लागतो. आता 52 लाख नोंदीचा पुरवा आहे. मात्र याही उलट मागणी नसताना काल- परवार मुख्यमंत्री फडणवीसांनी 29 जाती ओबीसीमध्ये घातल्या. मराठ्यांच्या नाकावर टिच्चून हा निर्णय घेणं ही मराठा समाजाविषयी खुन्नस नाही का? मराठ्यांच्या बाबतीतच येवल्या वाल्याचं पोट दुखतं.
पुरावे असतानाही सग्या सोयर्याची आंमलबजावणी करत नाही, आपली जात मागास असूनही आरक्षणात घेतली जात नाही. पण यावेळेस सगळ्या मागण्या पदरात घेतल्या शिवाय मुंबई सोडायची नाही, एकाही पोराला डिवचिलं तर इकडच्या माय माऊल्यांसह बांधवांनी एकही आमदार मंत्री रस्त्यानी फिरु द्यायचा नाही.
मुंबईत जर त्रास दिला तर राज्यातला पानंदरस्ताही मोकळा सोडायचा नाही, मरा÷ठ्यांच्या पुढं यायची मजल नाही कुणाची. एकदा मराठे बिघडले तर कोणाच्याच बापाला ऐकत नाही. दुसर्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका, आमच्यावर वारं करायचं थांबा तुम्हाला सत्ताच मराठ्यांनी दिली आहे.
फडणवीसांनी कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही. त्यांना आता जागाच राहिली नाही.
लाडक्या बहिणींना पैसेच द्यायनात आता, पगारच बंद करून टाकला. तुमचा ओबीसीचा डिएनए म्हणता मग लाडक्या बहिणी ओबीसी नाही का? त्यांचा पगार बंद केला. शेतकरी ओबीसी नाहीत का? करा कर्जमाफी. आम्ही जातीवादी नाहीत. दोन घरात मंत्री असून सुद्धा महादेव मुंडेचा प्रश्न सोडवला आम्ही जातीवादी नाहीत.
मुंबईची तयारी पूर्ण झाली आहे . खानदेश, विदर्भातले मराठे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी धावून येत आहेत. गाफील राहायचे दिवसं नाहीत सावधपणाने सगळ्यांनी लढाई लाढायची आणि जिंकायची आहे. फडणवीसांनी पण मांडलाय मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकरा- बाळांच वाटोळ करायचं. पण आम्ही ठरवलंय जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार मतभेद बाजूला सारून आंदोलनात सहभागी होण्याचे अवाहन करत सरकारचा बाप आडवा आलां तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार! असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
इशारा सभेसाठी बीड जिल्ह्यासह परसिरातील हजारो समाज बांधवांनी उपस्थिती होती. राष्ट्रगिताने सभेची सांगता झाली यावेळी बीड जिल्हा मुस्लिम समाज, धनगर समाज, दलित समाच्या शिष्टमंडळांने जरांगे पाटील यांचे स्वागत करून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी समाजातील आरक्षणाचा लाभ घेतलेल्या गुणवंतांकडूनही जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



Comments